विद्यार्थ्यांना गणित विषयातील *गणितीय माहिती, कृती व तंत्र* यांची माहिती *अध्ययन अनुभवातून, आंतरक्रियेतून* देणे आवश्यक आहे, असे झाल्यास प्रत्येक विद्यार्थी आपापल्या क्षमतेने गणित विषयावर प्रभुत्व मिळवू शकतो. विविध गणितीय खेळांच्या व प्रत्यक्ष कृतींच्या माध्यमातून त्यांना गणित अधिक *रंजक, सोपे* वाटू लागते, तसेच त्यांच्या विचार प्रक्रियेतील जसे- *सांख्यिकीकरण व अंदाज, सुसंगत मांडणी, गणितीय संप्रेषण, संबंध जोडणे* आदि अनेक घटकांचा विकास होऊ लागतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये *चिकित्सक विचारशक्तीचा* विकास वाढीस लागतो. *नेमकेपणा, अचूकपणा, चपळता, गती, वेग, काटेकोर विचार* करण्याची सवय वृद्धिंगत होते.
आदि सर्व घटकांचा विकास विद्यार्थांमध्ये विकसित होण्यासाठी इयत्ता ३ री ते ७ वी साठी गणित विषयांतर्गत *गुणाकार खेळ* हा खेळ घेण्यात आला. खेळाची कार्यवाही पुढील प्रमाणे.
उद्दिष्टे-
(०१) दोन अंकापासून संख्या तयार करता येणे. (०२) तयार केलेल्या संख्येचे अचूक वाचन करता येणे.
(०३) गुणाकार, बेरीज क्रिया अचूक करता येणे. (०४) गुण्य व गुणक या स्वरूपात गुणाकाराची मांडणी/रचना करता येणे.
(०५) समुहातील कोणती दोन अंकी संख्या तयार करावी व कोणता अंक गुणक म्हणून घ्यावा म्हणजे गुणाकार हा सर्वात मोठा येईल हे लक्षात घेणे.
(०६) दशक व एकक स्थानी कोणते अंक घ्यावे म्हणजे गुणाकार हा सर्वात मोठा येईल हे लक्षात घेणे.
(०७) गुणक म्हणून कोणता अंक घ्यावा म्हणजे गुणाकार हा सर्वात मोठा येईल हे विचारात/लक्षात घेणे.
(०८) गणिताच्या माध्यमातून विद्यार्थांच्या विचारप्रक्रियेचा विकास करणे.
(०९) विद्यार्थांमध्ये तर्कसंगत, तुलनात्मक, चिकित्सक, समस्येचे निराकरण व तसेच बहुदिश विचार करण्याची क्षमता निर्माण करणे.
(१०) अंदाज करता येणे.
(११) गणिती चिन्हांचा सुलभतेने वापर करण्याचे कौशल्य विकसित वा प्राप्त करणे.
(१२) गणितीय अध्ययनातून श्रमप्रतिष्ठेला महत्त्व आहे याची जाणीव निर्माण होणे.
(१३) सर्व स्तरातील विद्यार्थी गणित सारख्याच क्षमतेने शिकू शकतात हा विश्वास निर्माण करणे. (१४) गणिताबद्दल आवड निर्माण करणे.*
कार्यवाही~
(०१) दोन-दोन विद्यार्थांच्या जोड्या तयार करा /किंवा चार-चार किंवा पाच-पाच विद्यार्थांचे गट तयार करा.
(०२) *१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९* या अंकातील कोणतेही *तीन अंक* असे *तीन वेळा* प्रत्येकी विद्यार्थी याप्रमाणे घेण्यास सांगा. जसे- (अ) *२, ६, ८* (आ) *८, ४, ९* (इ) *७, २, ९*
(०३) आता प्रत्येक समुहामधील दोन अंक घेऊन दोन अंकी एक संख्या तयार करण्यास सांगा व त्याच समुहातील उर्वरीत (एका) अंकाने त्या तयार केलेल्या संख्येला गुणून गुणाकार करण्यास सांगा/लावा. *(प्रत्येक समुहातील त्या तीन अंकापैकी कोणतेही दोन अंक घ्या किंवा कोणते दोन अंक घ्याल असे न लिहिण्यामागचे/न विचारण्यामागचे/न सांगण्यामागचे कारण आपणास शोधायचे आहे.)*
(०४) तीनही समुहातील आलेले गुणाकार एकत्र करून त्यांची बेरीज करण्यास सांगा/लावा.
(०५) गटातील ज्या विद्यार्थाची *बेरीज सर्वाज जास्त/सर्वात कमी आली* त्याला विजयी घोषीत करा.
याप्रमाणे हा गणितीय खेळ शाळेत घ्या.
टिप-
(०१) सर्वात जास्त बेरीज येण्यासाठीचा खेळ घ्या. किंवा सर्वात कमी बेरीज यावी यासाठीचा हा गणितीय खेळ घ्या.
(०२) १ ते ९ पैकी कोणतेही तीन अंक दोन वेळा घेऊन सुध्दा हा खेळ घेता येतो.
अध्ययन निष्पत्ती~
(०१) १ ते ९ या अंकापासून (सुचविल्याप्रमाणे) संख्या तयार करतात.
(०२) तयार केलेल्या संख्येचे अचूक वाचन व लेखन करतात.
(०३) लहान-मोठी संख्या ओळखतात.
(०४) संख्यावर आधारित क्रिया करतात.
(०५) गणिताच्या माध्यमातून विद्यार्थांच्या विचारप्रक्रियेचा विकास होतो.
(०६) विद्यार्थी गणितीय क्रिया करत असताना तर्कसंगत, विश्लेषणात्मक, तुलनात्मक, चिकित्सक व तसेच बहुदिश असा विचार करू लागतात वा करतात.*
संकल्पना व लेखन~
श्री. संतोष मो. मनवर
जि.प.उ.प्रा.शाळा पंचाळा.