परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Wednesday, March 25, 2020

Word Building.

इयत्ता ३री व ४थी या इयत्तेसाठी इंग्रजी विषया अंतर्गत 'Word Building' (Use the letters to make suitable words) हा उपक्रम घेतला. विद्यार्थ्यांनी सदरील उपक्रमात सक्रीय  सहभाग नोंदविला.

प्रथमत: शब्द निर्मिती कशी करायची या संदर्भात मार्गदर्शन केले.
जसे~तक्त्यांच्या चौकटीत इंग्रजी मुळाशरे वापरून शब्द तयार करायचा असा हा खेळ आहे. कोणत्याही अक्षरापासून सुरूवात करून वर, खाली, आडवे, तिरके, कडेला अशा कोणत्याही दिशेने जाऊन चौकटीतून अक्षरे घ्यायची व योग्य शब्दाची मांडणी करायची. एक अक्षर दोन वेळा घेतले तरी चालेल, तयार होणारे शब्द कितीही अक्षरांचे असले तरी चालतील.

    चौकटीतील अक्षरापासून विद्यार्थ्यांना एक शब्द तयार करून दाखविला असता सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांनी चौकटीतील अक्षरापासून परिचित असे बरेचसे शब्द तयार केले. for ex- or, for, cat, ..................अशा प्रकारे हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.

अध्ययन निष्पत्ती~
(१) तर्कशक्ती विकसित होणे.
(२) निरीक्षण क्षमता विकसन.
(३) शब्द निर्मितीचा (स्वनिर्मितीचा)आनंद.
(४) शब्दसाठा वाढीस मदत होते.
(५) शब्दाचे अचूक उच्चारासह वाचन करता येते. (६) गटात सहकार्याची भावना वाढीस लागते.
(७) गटात चुकांचे निरसन करता येते.
(८) नविन ज्ञानप्राप्तीचा आनंद होणे.
(९) गटात सहभागी होण्यामुळे/झाल्यामुळे समाधान वाटणे.
(१०) आत्मविश्वास वाढीस लागणे.
 
  अशाप्रकारे वेगवेगळे उपक्रम शाळेत राबविल्यास विद्यार्थ्यांमध्ये बोधात्मक, भावात्मक व कौशल्यात्मक बदल घडून येण्यास नक्कीच मदत होईल.


शब्द निर्मिती~श्री. संतोष मनवर

No comments:

Post a Comment

****