परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Wednesday, March 11, 2020

संख्यांचे टप्प्यात लेखन.

     संख्यांचे टप्प्यात लेखन
आज ३ री व ४ थी या इयत्तेसाठी गणित विषया अंतर्गत *"संख्यांचे टप्प्यात लेखन"* हा उपक्रम राबविला.

उपक्रमाचा मुख्य हेतू -
दिलेल्या संख्येपेक्षा २ ने, ३ ने, ४ ने,........वाढत जाणार्‍या(.....च्या टप्प्यातील) संख्यांचे लेखन-वाचन करता येणे हा होय.

शैक्षणिक साहित्य~
*खडू, फळा. वही, पेन.*

*कृती*~
(०१) कोणतीही एक, एक अंकी, दोन अंकी, तीन.         अंकी, .......संख्या घ्या.
(०२) दिलेल्या/घेतलेल्या संख्येपेक्षा २ने, ३ने, ४ने,           ५ने, .... वाढत जाणर्‍या(....च्या टप्प्यातील)           संख्या लिहा. उदा. ५४१ ही संख्या घेतली.             या संख्येपेक्षा ३ने वाढत जाणार्‍या संख्या.             नऊ, दहा.... पर्यंत लिहा. जसे- ५४१, ५४४,           ५४७, ५५०, ५५३, ५५६, ५५९, ५६२, ५६५,           ५६८
       अशाप्रकारे हा उपक्रम शाळेत राबविला.

*या उपक्रमातून साध्य होणारे इतर उपक्रम*~
(१) तयार केलेल्या संख्यातील सर्वात लहान,                सर्वात मोठी संख्या ओळखणे.
(२) संख्या वाचनाचा सराव.
(३) संख्यांतील प्रत्येक अंकांची स्थानिक किंमत.          सांगता येणे.
(४) संख्यांची विस्तारित रुपात मांडणी.
(५) प्रत्येक अंकाचे स्थान ओळखणे.
(६) सम-विषम संख्या सांगता येणे.
(७) संख्यांचे अक्षरात लेखन करणे.
(८) कोणतीही दोन संख्या घेऊन बेरीज,                      वजाबाकी करता येणे.
(९) कोणतीही एक संख्या घेऊन त्यातील.                  कोणत्याही एका अंकाने, दोन अंकाने/संख्येने.        गुणणे, भागणे.
(१०) संख्यांचा आकृतिबंध तयार करणे.
(११) संख्यांचा चढता-उतरता क्रम लावणे.

*अध्ययन फलनिष्पत्ती*~
(०१) विद्यार्थी - विद्यार्थी, विद्यार्थी - शिक्षक.                  आंतरक्रियेद्वारा गणितीय मूलभूत.                        संकल्पना स्पष्ट होतात.
(०२) विद्यार्थांना नवनिर्मितीचा आनंद होतो.
(०३) स्वत: शिकता येते या संदर्भाने आत्मविश्वास.          वाढीस लागतो.
(०४) स्वत: विचार करणे, तर्कसंगत विचार,                  विश्लेषण, संश्लेषण आदि वैचारिक कौशल्ये.          विकसित होतात.
(०५) स्वयंअध्ययनामुळे विद्यार्थ्यांना मोकळेपणा.            वाटतो त्यामुळे शिक्षकाचे दडपण कमी होते.
(०६) विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील/अध्ययनातील.              अडथळे लक्षात येतात, त्यामुळे वैयक्तिक.              मार्गदर्शन करता येते.

When the *atmosphere* encourages *learning*, the learning is *irresistible*.

संकल्पना व शब्दनिर्मिती~
संतोष मनवर
जि.प.उ.प्रा.शाळा पंचाळा पं.स. मानोरा
जि. वाशिम.

No comments:

Post a Comment

****