परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Sunday, March 29, 2020

प्रश्ननिर्मिती.

मित्रांनो, आज ३री व ४थी या इयत्तेसाठी मराठी विषयांतर्गत *"प्रश्ननिर्मिती"*(का? कसे? कोण? केव्हा? कोठे? या संदर्भात) हा उपक्रम राबविला.
 
साहित्य~ पाठ्यपुस्तकातील, संदर्भपुस्तिकेतील मजकूर, कथा, कविता, संवाद आदि.

   प्रथमत: फळ्यावर सावितसावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील आशयाचे लेखन करून दिले व विद्यार्थ्यांकडून सदरील आशयाचे समजपूर्वक वाचन करून घेतले. सदरील मजकूरावर प्रश्ननिर्मिती कशी करावी याबद्दल योग्य असे पूरक मार्गदर्शन केले.
   तद्वनंतर विद्यार्थ्यांना सदरील मजकूरावर प्रश्ननिर्मिती करण्यास सांगितली असता विद्यार्थ्यांनी का? कसे? कोण? केव्हा? कोठे? कधी? आदि शब्दांवर आधारित बरीच प्रश्ननिर्मिती केली. तसेच संबधित प्रश्नाला अनुसरून विध्यार्थांनी उत्तरे सुद्धा अचूक दिली. सदरील आशयावर प्रश्ननिर्मिती करत असताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येत होता.

शेवटी "कृती आहे तेथे मेंदूला चालना आहे.
   मेंदूला चालना आहे तेथे नक्कीच विकास आहे."

 अध्ययन निष्पत्ती~
(०१) समजपूर्वक वाचन करणे.
(०२) निरिक्षण क्षमता विकसन.
(०३) आत्मविश्वास वाढीस लागणे.
(०४) स्वनिर्मितीचा आनंद.
(०५) गटात सहकार्याची भावना.
(०६) गटात चुकांचे निरसन.

शब्दनिर्मिती~
 श्री. संतोष मनवर

No comments:

Post a Comment

****