परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!
Showing posts with label कुतूहल. Show all posts
Showing posts with label कुतूहल. Show all posts

Friday, May 10, 2019

पृथ्वी स्वतःभोवती गिरकी का मारते?

🌎 *पृथ्वी स्वतःभोवती गिरकी का मारते?*

आपली पृथ्वीच नाही तर सगळे ग्रह अशी गिरकी घेत असतात. प्रत्येकाचा अशी एक प्रदक्षिणा करण्याचा 'वेग' वेगवेगळा असतो. ज्या प्रक्रियेतून ग्रहांचा जन्म होतो, त्याचाच हा परिणाम आहे. आकाशात इतस्तत: अनेक पदार्थ, वायू वेडेवाकडे पसरलेले असतात. त्यापैकी प्रत्येकाला इतर सर्वांच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवत असते. कालांतराने त्या अोढीपायी त्यातले काही पदार्थ एकत्र येतात. त्यांचा जुडगा बनतो. साहजिकच त्याचं वस्तुमान जास्त असल्यामुळे त्यांची इतरांना वाटणारी ओढ जास्त होते. त्यामुळे पदार्थांचे आणखी काही कण त्याला येऊन चिकटतात. अशा साखळी पद्धतीने हळूहळू ग्रहाचा जन्म होतो. तो होत असताना त्या गुरुत्वाकर्षणाच्या सर्व बाजूंना सारख्याच वाटणाऱ्या ओढीपायी ते पदार्थ ओढले जात असताना त्यांना चक्राकार गती मिळते. तीच मग ते पदार्थ ज्याला चिकटतात त्या ग्रहांकुरालाही मिळते.
ग्रहांकुराच्या केंद्रस्थानात त्यातल्या पदार्थाची घनता साहजिकच जास्त असते. एखादा लाडू वळताना तो दाबला जात असतो. त्यामुळे त्याचा मध्यभाग जास्त घट्ट झालेला असतो तशातलाच हा प्रकार. त्यामुळं त्या ग्रहाच्या परिघावरच्या पृष्ठभागाला केंद्राच्या गुरुत्वाकर्षणाची जास्त ओढ वाटते. पण विखुरलेल्या पदार्थांपासून घन ग्रहाचा जन्म होताना त्याचा व्यास कमी होत जातो. त्यामुळे त्या वर्तुळाकार गतीचा वेगही वाढत जातो. कथक नृत्य करणारी नर्तकी जेव्हा गिरकी घ्यायला लागते तेव्हा त्या गिरकीची गती वाढवायची असेल तर ती आपले हात अंगासरशी ओढून घेते, म्हणजेच अंगाच्या गोलाचा व्यास कमी करते. तेच हा हात पसरलेले असले की त्या गिरकीचा वेगही कमी होतो. तशीच ग्रहाचीही अवस्था असते. त्याचा पसारा कमी होत जातो, तो अधिक घन बनतो तसा त्याचा वर्तुळाकार भ्रमणाचा वेगही वाढत जातो. त्यामुळे गिरकी घेणं हा प्रत्येक ग्रहाचा स्थायीभावच आहे. पृथ्वी ही त्याला अपवाद नाही.
मग चंद्र का गिरकी घेत नाही ? त्याचा एक भाग सतत आपल्या डोळ्यांसमोर राहतो ते का ? असे प्रश्न कोणीही विचारेल; पण चंद्र गिरकी घेत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. चंद्राचा स्वतःभोवती गिरकी घेण्याचा वेग हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या वेगाइतकाच असल्यामुळे त्याचा एक चेहरा आपल्याला सतत दिसत असतो एवढंच. एरवी आकाशातला इतर कोणत्याही गोल गोलासारखा तोही स्वतःभोवती गिरकी घेतच असतो.

उलटी का होते?

📙 *उलटी का होते ?* 📙
           उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल.
पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधे, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात म्हणजे उलटी होते.
खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते.
पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते. 
उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी, मानतात ताठरणे अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे.

Thursday, February 28, 2019

आकाशात निळे का दिसते?

पृथ्वीचे वातावरण हे वायू, पाण्याची वाफ, धूळ कण इत्यादीने बनले आहे. हे वातावरण पृथिवीच्या सभोवताल आहे. जेव्हा या मधून सूर्याचा प्रकाश प्रसार पावतो तेव्हा निळा रंग हा सर्वोतोपरी पसरतो कारण निळा रंग हा प्रसारण पावलेल्या सर्व रंगात जास्त असतो. म्हणून आकाश हे निळ्या रंगाचे दिसते

Wednesday, February 27, 2019

आपला मेंदू किती GB चा आहे?

आपला मेंदू किती GB चा आहे?
मेंदूची क्षमता असते अंदाजे २.५ पेटाबाईट.
१ पेटाबाईट म्हणजे १००० टेराबाईट.
१ टेरा बाईट १००० जीबी.
म्हणजे १६ जीबीची मेमरी असलेले १ लाख ५६ हजार फोन!! मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे, सपष्ट होते, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे. मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालण्याइतक्या लांबीच्या होतील. आपल्या मेंदूमध्ये १०००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात. आकाशगंगेत असणाऱ्या ताऱ्यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील! एका मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकापुढे एक मांडले तर त्याची लांबी साधारणपणे १००० कि.मी. एवढी होईल. पण न्यूरॉन्सची रुंदी फक्त १० मायक्रॉन असल्यामुले ते आपल्याला दिसणारच नाहीत.
****