परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Sunday, March 15, 2020

नावे उच्चारा, जागा बदला.

मुलांना शिकण्याची गोडी लागावी, शिकण्याची वृत्ती निर्माण व्हावी, वेगवेगळे कौशल्य प्राप्त होऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात समरस होता यावे. वेगवेगळ्या खेळातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा तसेच त्यांच्या अध्ययनाचे अनुशेष भरून निघण्यासाठी व प्रभुत्व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आणि आनंददायी कृतीवर आधारित अध्ययनाची संधी व अभिव्यक्तीस वाव देण्यासाठी इयत्ता २ री ते ७ वीच्या विद्यार्थांसाठी *नावे उच्चारा, जागा बदला.* हा खेळ घेतला.

खेळाचा मुख्य हेतू~
(०१) श्रवण कौशल्य विकसित होणे.
(०२) सूचना लक्षपूर्वक ऐकूण त्यानुसार योग्य कृती करता येणे हा होय.

खेळाची कार्यवाही~
(०१) विषम संख्यामध्ये विद्यार्थ्यांना वर्तुळात उभे करा.
(०२) एका विद्यार्थ्याला वर्तुळमध्यात उभे करा. (०३) खेळासाठी फळे, फुले, रंग, वाहने, संख्या, मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दकार्डे, मराठी, इंग्रजी मुळाक्षरे, पूर्ण दशक संख्या, प्राणी, पक्षी, गावांची, तालुक्यांची, जिल्ह्यांची, देशांची नावे तसेच भाज्या* आदि यापैकी कोणताही एक विषय खेळासाठी निवडा. उदा.~ फळे. फळांमध्ये कोणत्याही तीन फळांची नावे खेळासाठी निवडा जसे- आंबा(Mango), केळी(Banana), सफरचंद(Apple)
(०४) वर्तुळातील एका विद्यार्थ्याला आंबा, दुसऱ्या विद्यार्थ्याला केळी तिसऱ्या विद्यार्थ्याला सफरचंद अशी नावे द्या. पुन्हा चौथ्या विद्यार्थ्याला आंबा, पाचव्याला केळी, सहाव्या विद्यार्थाला सफरचंद, सातव्याला आंबा,......... याप्रमाणे नावे द्या.
(०५) खेळ कसा खेळावा या संदर्भाने प्रात्यक्षिक मार्गदर्शन करा.
(०६) आता वर्तुळमध्यातील विद्यार्थ्याला आंबा, केळी, सफरचंद यापैकी कोणतेही एक नाव उच्चारण्यास सांगा.
(०७) आंबा, केळी, सफरचंद यापैकी जे नाव उच्चारले असेल त्याच नावाच्या विद्यार्थ्यांनी आपापली जागा बदलावी/ एकमेकांची जागा घ्यावी.
(०८) जागा बदलत असताना वर्तुळमध्यातील विद्यार्थ्याने सुद्धा जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करावा.
(०९) जागा बदलत असताना ज्या विद्यार्थ्याला जागा मिळणार नाही त्या विद्यार्थ्याला वर्तुळमध्यात उभे राहण्यास सांगून पुन्हा खेळ सुरू करण्यास सांगावे.
     अशाप्रकारे हा खेळ शाळेत घ्यावा.

अध्ययन निष्पत्ती~
(०१) सूचनेनुसार अचूक कृती करतात.
(०२) विद्यार्थी खेळातील, कृतीतील सहभाग, सातत्य, अचूकता, गती आदी. टिकवून ठेवतात.

संकल्पना~
संतोष मो. मनवर
जि प उ प्रा. शाळा पंचाळा.

No comments:

Post a Comment

****