परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Monday, April 6, 2020

गमतीचा गुणाकार!!!

मित्रांनो, आज गणित विषयांतर्गत इयत्ता ३री व ४थी साठी *"गुणाकार करणे"* हा उपक्रम राबविला. उपक्रमाचा मुख्य हेतु *"उलट-सुलट संख्या करून गुणाकार केला तरी उत्तर तेच येणार"* हा होता.

१२×(४२, ६३, ८४) 
२६×(३१, ९३),
२८×४१, 
३१×(२६, ३९),
३२×(४६, ६९)
३४×८६,
३६×(४२, २१,८४), 
३९×(३१, ६२),
४१×२८,
४२×(१२, ३६, ४८),
४३×६८,
४६×(३२, ९६),
४८×(२१,४२, ६३),
६२×(३९, १३),
६३×(१२, २४, ४८),
६४×(२३, ६९),
६८×४३,
६९×(३२, ६४),
८२×१४,
८४×(१२, २४, ३६),
८६×३४,
९३×(१३, २६), 
९६×(२३, ४६),
१३×(६२, ९३),
१४×८२,
२१×(२४, ३६, ४८),
२३×(६४, ९६),
२४×(२१, ६३, ८४)  अशा
वर काही दोन अंकी संख्यांच्या जोड्या दिल्या आहेत.

प्रथमत: एक उदाहरण घेऊण गुणाकाराची संकल्पना, संबोध स्पष्ट करून दिला. उपरोक्त  कोणत्याही संख्यांच्या जोडीचा गुणाकार केला तर तो समानच येतो. जसे~ १२×४२=५०४ याउलट २१×२४=५०४, १२×६३=७५६ याउलट संख्या घेउन २१×३६=७५६.
अशाप्रकारे गुणाकारक्रिया संकल्पना स्पष्ट करून दिली व विद्यार्थ्यांनी  उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.

           तसे पाहता अशा संख्यांच्या जोड्या शोधणे फारसे अवघड नाही. त्याची एक सोपी पध्दत आहे, ती म्हणजे *आपल्याला ज्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे, त्या संख्यातील एककस्थानच्या संख्यांचा गुणाकार व दशक स्थानच्या संख्यांचा गुणाकार हा समान यायला पाहिजे*.
           तर आहे ना मग गंमत मित्रांनो. चला तर मग आपणही अशा संख्या तयार करूया.

*फलनिष्पत्ती*~
(०१) चिकित्सकवृत्ती विकसित होणे.
(०२) संशोधनवृत्ती विकसन.
(०३) गुणाकारक्रिया करता येणे.
(०४) नवनिर्मितीचा आनंद.
(०५) आत्मविश्वास वाढीस लागणे.
(०६) गटात चुकांचे निरसन.
(०७) गटात सहकार्याची भावना विकसित होणे. (०८) तर्कसंगत विचार करणे.
(०९) अचूकता, एकाग्रता, चिकाटी, नेमकेपणा, काटेकोरपणा आदी गुणांचा विकास होणे.

उपक्रमाची उद्दिष्टे~
(०१) विद्यार्थ्यांमध्ये स्वयंअध्ययनाच्या सवयी विकसित करणे.
(०२) अध्ययनास भौतिक व मानसिक वातावरण तयार करणे.
(०३) विद्यार्थ्यांच्या मुक्त अभिव्यक्तीला वाव देणे. (०४) नविन माहिती मिळविण्याची जिज्ञासा वृध्दिंगत करणे.
(०५) शैक्षणिक साहित्य व विद्यार्थी आणि  विद्यार्थी - विद्यार्थी आंतरक्रियातून स्वयंअध्ययनास चालना देणे.
(०६) स्वत:च्या गतीनुसार अध्ययन करण्याची संधी देणे.
(०७) आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणे.
(०८) कृतिशील अध्ययनावर भर देणे.
(०९)  अतिरिक्त पूरक मार्गदर्शन.

शब्दनिर्मिती~
श्री. संतोष मनवर

No comments:

Post a Comment

****