- * अलंकारिक शब्द *
- श्रीगणेशा - आरंभ करणे
- अष्टपैलू - सर्वगुणसंपन्न
- अकरावा रुद्र - अतिशय तापट माणूस
- अकलेचा कांदा - अत्यंत मूर्ख माणूस
- अरण्य रुदन - ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
- अरण्य पंडित - मूर्ख मनुष्य
- अष्टपैलू - अनेक चांगले गुण असलेला
- अळवावरचे पाणी - फार काळ न टिकणारे
- अक्षरशत्रू - निरक्षर माणूस
- अंडीपिल्ली - गुप्त गोष्ट
- अंधेर नगरी - अव्यवस्थितपणाचा कारभार
- ओनामा - सुरुवात, प्रारंभ
- अमरपट्टा – अमरत्वाचे आश्वासन
- अडेल तट्टू – हट्टी माणूस
- आग्या वेताळ – अत्यंत रागीट मनुष्य
- * उ *
- उंटावरचा शहाणा - मूर्खपणाचा सल्ला देणारा
- उंबराचे फुल - अगदी दुर्मिळ वस्तू
- उडते पाखरू - अस्थिर मनाचा
- * क *
- कळीचा नारद - कळ लावणारा
- काडीपहिलवान - हडखुळा
- कोल्हेकुई - क्षुद्र लोकांची बडबड
- कुपमंडूक - संकुचित वृत्तीचा
- कर्णाचा अवतार - उदार माणूस
- कळसूत्री बाहुले - दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
- कुंभकर्ण - झोपाळू माणूस
- कैकयी/मन्थरा - द्रुष्ट स्री
- कपिलाषष्ठीचा योग - दुर्मिळ योग
- कुबेर - खूप श्रीमंत माणूस
- * ख *
- खडाजंगी - मोठे भांडण
- खडाष्टक - जोरदार भांडण
- खुशाल चेंडू - चैनी माणूस
- खेटराची पूजा - अपशब्दाने खरडपट्टी काढणे
- खोगीर भरती - निरुपयोगी माणसांचा समूह
- * ग *
- गंडांतर - भीतीदायक संकट
- गाजरपारखी - कसलीही पारख नसलेला, मूर्ख
- गुरुकिल्ली - मर्म, रहस्य
- गप्पीदास - थापा गप्पा मारणारा
- गर्भश्रीमंत - जन्मापासून श्रीमंत
- गंगा यमुना - अश्रू
- गाढव - बेअकली माणूस
- गुळाचा गणपती - मंद बुद्धीचा
- गोकुळ - मुलाबाळांनी भरलेले घर
- गोगलगाय - गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
- गारुडी – सापांचा खेळ करणारा
- गुलाबाचे फुल – नाजुक स्त्री
- * घ *
- घरकोंबडा - घराबाहेर न पडणारा
- घोरपड - चिकाटी धरणारा
- घर भेद्या - गुप्त गोष्टी शत्रूला सांगणारा
- घटकेचे घड्याळ - क्षणभंगुर
- * च *
- चालता काळ - वैभवाचा काळ
- चौदावे रत्न - मार
- चरपट पंजरी - निरर्थक बडबड
- चिटणीस - पत्रव्यवहारासारखे काम करणारा शासकीय अधिकारी
- चाकरमाने - शहरात कायमस्वरूपी नोकरी करणारे मध्यमवर्गीय
- चाणक्य - कारस्थानी माणूस
- चंडिका - कजाग स्त्री
- चामुंडा - भांडखोर स्त्री
- * छ *
- छत्तीसचा आकडा - शत्रुत्व
- * ज *
- जमदग्नीचा अवतार - रागीट माणूस
- * ट *
- टोळभैरव - कामात नासाडी करणारे लोक
- * ठ *
- ताटाखालचे मांजर - दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा
- * थ *
- थंडा फराळ - उपवास
- * द *
- दगडावरची रेघ - कधीही न बदलणारे
- दुपारची सावली - अल्पकाळ टिकणारे
- देवमाणूस - साधाभोळा माणूस
- * ध *
- धोपट मार्ग - सरळ, नेहमीचा मार्ग
- धारवाडी काटा - बिनचूक वजनाचा काटा
- * न *
- नवकोट नारायण - खूप श्रीमंत
- नंदीबैल - मंदबुद्धीचा
- नखशिखांत - सर्व शरीरभर
- नरसिंह - उग्र व पराक्रमी
- * प *
- पांढरा परिस - लबाड
- पर्वणी - अतिशय दुर्मिळ योग
- पांढरा कावळा - निसर्गात नसलेली वस्तू
- पाताळयंत्री - कारस्थान करणारा
- पिकले पान - म्हातारा मनुष्य
- पर्वणी - दुर्मिळ योग
- पाप्याचे पित्तर - सडपातळ माणूस
- पंक्ती प्रपंच - पक्षपात
- पोतराज - आंगावर चाबाकाचे फटके मारून कला दाखवणारा
- पोपटपंची - अर्थ न समजताच पाठ करणारा
- * ब *
- बोलाचीच कढी बोलाचाच भात - केवळ शाब्दिक वचने
- बोकोसंन्यासी - ढोंगी मनुष्य
- बृहस्पती - बुद्धिमान व्यक्ती
- बहूभाषा कोबिद - अनेक भाषांचे ज्ञान असणारा
- बुरूड - कामटयापासून सूप, टोपल्या बनवणारा
- बहुरूपी - विविध रुपे घेऊन मनोरंजन करणारा
- बहूश्रुत - भरपूर ऐकलेला वं माहिती असणारा
- बिनभाड्याचे घर - कारागृह
- * भ *
- भगीरथ प्रयत्न - आटोकाट प्रयत्न
- भीष्मप्रतिज्ञा - कठीण प्रतिज्ञा
- भाकड कथा - निरर्थक गोष्टी
- भडभुंजा - पोहे, मुरमुरे इ. विकणारा
- भोजनभाऊ - ऐतखाऊ माणसे
- * म *
- मायेचा पूत - पराक्रमी मनुष्य, मायाळू
- मारुतीचे शेपूट - लांबत जाणारे काम
- मृगजळ - केवळ अभास
- मेषपात्र - बावळट मनुष्य
- मंथरा - दृष्ट स्वभावाची स्त्री
- मारूतीचे शेपूट - लांबत जानरे काम
- मुमुक्ष - मोक्षप्राप्तीची इच्छा धरणारा साधक
- मेघश्याम - ढगासारखा सावळा
- मुक्ताफळे - वेडेवाकडे बोल
- मगरमिठ्ठी - घट्टपकड
- * य *
- यूयुत्सु - लढाईची इच्छा बाळगणारा
- यमपुरी - तुरुंग
- योगिनी - योगाभ्यास करणारी स्त्री
- याज्ञिक - धर्मसंस्कार विधी करणारा
- युगप्रवर्तक - नवे युग निर्माण करणारा
- * र *
- रामबाण औषध - अचूक गुणकारी
- रत्नपारखी - जडजवाहिरांची पारख करणारा
- रडतराऊ - नेहमी रडगाणे गाणारा
- राजा हरिशचंद्र - सत्यवचनी माणूस
- रांडकारभार - बायकी कारभार
- रामबाण - खात्री लायक उपाय, इलाज
- रुपेरी बेडी - चाकरी
- * ल *
- लंकेची पार्वती - अंगावर दागिने नसलेली स्त्री
- * व *
- वाकनिस - वाड्यातील मालमत्तेची सर्व व्यवस्था पाहणारा
- व्यासंगी - भरपूर ज्ञानग्रहण करणारा
- वासुदेव - रामप्रहरी रामाचे गाणे म्हणत सगळ्यांना जागे करणारा
- वाघ्या-मुरळी - खंडोबाच्या नावाने सोडलेलेल पुरुष व स्त्री
- विदूषक - सर्कशीत हास्य विनोदाव्दारे मनोरंजन करणारा
- वैष्णव – विष्णूची उपासना करणारा
- * श *
- शेंदाड शिपाई - भित्रा मनुष्य
- शिरस्तेदार – कचेरीतला अव्वल दर्जाचा कारकून
- शैव – शंकराचा उपासकउपासक
- * स *
- सिकंदर - भाग्यवान
- सिकंदर नशीब - फार मोठे नशीब
- सव्यसाची - डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
- स्मशान वैराग्य - तात्कालिक वैराग्य
- सांबाचा अवतार - अत्यंत भोळा मनुष्य
- सुळावरची पोळी - जीव धोक्यात घालण्यासारखे काम
- सूर्यवंशी - उशिरा उठणारा
- सोन्याचे दिवस - चांगले दिवस
- सांडणीस्वार - उंटावरून टपाल पोहोचवणारा
- सारथी - रथ चालविणारा
- सोंगाड्या - वगनाट्यात विविध भूमिका करणारा
- सत्तीचे वाण - दृढनिश्चय
- * ह *
- हरीचा लाल – विशेष व्यक्ति
- हरीशचंद्र – सत्यवचनी माणूस
- हिंगाचा खडा – त्रासदायक माणूस
परिपाठ
- शासन निर्णय
- साहित्यिक टोपणनावे
- इंग्रजी-मराठी शब्दकोश
- Free Maths
- अध्ययन निष्पत्ती प्राथ.व उच्च प्राथ.
- इयत्तानिहाय विषयवार तासिका
- वेळापत्रक
- सेवापुस्तक,रजा,वेतन माहिती
- विकासपिडिया
- Age-Calculator
- महाराष्ट्र - तालुका नकाशे
- E - Paper Gallery
- भाषणे
- शुद्धलेखनाचे नियम
- गोष्टी mp3
- महाराष्ट्रातील किल्ले-माहिती
- मराठी देशा
- मराठीतून विज्ञान शिक्षण
- महा करियर मित्र
- SSC exam & ICT
- अवकाश वेध
- भारतरत्न पुरस्कार विजेते
- संपूर्ण आयुर्वेद (सारांश)
- Pdf Drive (e-books)
- मराठी विश्वकोश
- मराठी विज्ञान परिषद
- औषधी वनस्पती
- Roman numerals converter
- 7th Pay Calculater.
- मासिक नियोजन 1ली ते 7वी
- वार्षिक नियोजन 1ली ते 8वी
- प्रश्नपेढी 1ली ते 8वी (मराठी)
- प्रश्नपेढी 1ली ते 8वी (गणित)
- गणिती कोडी
- बोधकथा
- हिंदी शब्दकोश
Saturday, May 4, 2019
अलंकारिक शब्द
Labels:
अलंकारिक शब्द
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment