परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Saturday, March 7, 2020

जादुई गणित!!!

कोणत्याही मार्गांनी मिळणारे ज्ञान हे एकात्म (Integrated) असते. शिक्षक, विद्यार्थी, पालक व समाजघटक अशा प्रत्येकांनी(साठी) ज्ञान मिळविणे व त्याचे आकलन होणे हे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार, गरजेनुसार व त्यांच्या आकलन पातळीनुसार सुलभकांनी आवश्यक ते ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आकलनपूर्ण अध्ययन व्हावे यासाठी/होण्यासाठी आज इयत्ता ३ री ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी *जादूई गणित(Mathematical magics)* हा उपक्रम राबविला.

हेतू<> *(०१) उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची, अभिवृत्ती निर्माण करणे.
(०२) गणित सर्वांना कळू शकते या विश्वासाने वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यामध्ये गुंतवून ठेवणे/गुंतवू पाहणे.
(०३) सूचनेनुसार उदाहरणात बदल करता येणे. (०४) विद्यार्थ्यांमध्ये आकडेमोड करण्याचे कौशल्य विकसित करणे.
(०५) आवश्यक त्या रचना उदाहरणात करता येणे. (०६) उदाहरणांचे उत्तर पडताळून पाहणे. आदि हा होय.*

Procedure of Activity (उपक्रमाची कार्यवाही)--
(०१) कोणतीही तीन अंकी एक संख्या घ्या. घेतलेल्या संख्येतील एकक व शतक स्थानचे अंक मात्र भिन्न असावेत. उदा~ २७८
(Take any three digit number in which the first and last digits differ by two or more. for ex. 278.)

(०२) आता लिहिलेली/घेतलेली संख्या उलट क्रमाने लिहा.२७८~ *८७२*
(Write the given/written/this number in reverse order.278~872)

(०३) आता यातील मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. जसे ८७२- २७८=५९४
(Now, subtract the smaller of the two numbers from the bigger one. for ex. 872- 278= 594)

(०४) आता आलेली वजाबाकीची संख्या उलट क्रमाने लिहा. जसे~ ५९४~ *४९५*
(Now reverse this number of subtraction, we get 594 as *495*

(०५) आता या दोन संख्यांची बेरीज करा. जसे~ ५९४+४९५ = १०८९
(Now, add this two numbers, The result is 594 + 495 =1089)

(०६) आता खात्री करा सर्वांची आलेली बेरीज ही सारखी संख्या आहे/असेल म्हणजे १०८९ आहे.(No matter which three digit numbers we start with the result is always 1089)

 याप्रमाणे विद्यार्थांकडून आणखी उदाहरणे सोडवून घ्या. *चार अंकी संख्येसाठी उत्तर १०८९० येते. मात्र चार अंकी संख्या घेताना एकक व हजार स्थानचे अंक भिन्न असावेत.*

अशी उदाहरणे सोडविण्यास मुलांना आनंद होतो.

सदरील उपक्रमातून अध्ययन फलनिष्पत्ती~
(०१) विद्यार्थी स्वत:ची संख्या तयार करतात.
(०२) संख्यालेखन, संख्यावाचन करतात.
(०३) लहान मोठी संख्या ठरवितात.
(०४) बेरीज, वजाबाकी क्रिया अचूक करतात. (०५) अचूक उत्तर मिळवितात.
(०६) एकक, दशक, शतक स्थानचे अंक ओळखतात.
(०७) सम, विषम संख्या ओळखतात.
(०८) संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लक्षात घेतात.*

संकल्पना व लेखन(Concept and written)~ *संतोष मो. मनवर(Santosh M. Manwar)*
जि.प.उ.प्रा.शाळा पंचाळा Z.P.U.P School Panchala.

1 comment:

  1. This is really good activity. Students feel happy seeing same answer of all students.

    ReplyDelete

****