परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Sunday, October 4, 2020

वाचनातून माहितीचे संग्रहण.

 उपक्रम~ *वाचनातून माहितीचे संग्रहण.*


उपक्रमाचा हेतू~ *(०१) अर्थाचे आकलन होणे. 

(०२) लेखनामागील हेतू, भूमिका व संदर्भ समजणे हा होय.*


उपक्रमाची कार्यवाही~ 

(A) विद्यार्थ्यांचे दोन-दोनचे गट करा.

(B) लग्नपत्रिका/वर्ग  क्षमतेनिहाय सोपे परिच्छेद उपलब्ध करा. 

(C) लग्नपत्रिका/परिच्छेद दोघांनाही सहज दिशेल अशी ठेवा. 

(D) लग्नपत्रिकेवर/परिच्छेदावर आधारित प्रश्नांची यादी तयार करा. 

(E) या प्रमाणे गटात दोघांसाठी प्रश्न विचारा. 

(F) विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर जो विद्यार्थी सर्वात आधी देईल त्याला एक गुण द्या. 

(G) अशाप्रकारे ज्या गटाला सर्वात जास्त गुण आहे अशा विद्यार्थ्यांना विजयी घोषित करा.

    अशाप्रकारे हा उपक्रम शाळेत घ्यावा.

उदाहरणादाखल काही प्रश्न- -

जसे- 

(1) या कार्डावरील निमंत्रण कशाचे आहे? 

(2) लग्न पत्रिकेवरील वधुचे व वराचे नाव काय? 

(3) वधुच्या वडिलांचे नाव काय आहे? 

(4) वराच्या वडिलांचे नाव काय आहे? 

(5) वधूचे संपूर्ण नाव काय? 

(6) वराचे संपूर्ण नाव काय? 

(7) वधू कोणत्या गावची आहे? 

(8) वर कोणत्या गावचा आहे? 

(9) लग्नपत्रिका वधूकडील आहे की वराकडील? हे तुम्ही कशावरून ओळखले? 

(10) लग्न कुठे आहे? 

(11) लग्न कोणत्या तारखेला आहे? 

(12) लग्न कोणत्या महिन्यात आहे? 

(13) लग्नाची वेळ किती? किंवा लग्न लागण्याची वेळ काय आहे?  

(14) लग्नाचा वार कोणता आहे? 

(15) लग्न पत्रिकेतील लग्नाचा  इंग्रजी महिना, दिनांक व साल कोणते? 

(16) वराच्या राहण्याचा पत्ता काय आहे? 

(17) लग्नपत्रिका कोणत्या प्रेसमध्ये छापल्या आहेत? (18) स्वागतोत्सुक कोण आहेत? 

(19) आहेरासंबंधी काही उल्लेख आहे का? काय उल्लेख आहे?

(20) लग्नाची पत्रिका वाचताना कोणत्या बाबी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे? 

(21) महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवल्या नाहीत तर काय होईल?

(22) लग्न, वधु, वर, कन्या, चिरंजीव, ज्येष्ठ या शब्दांचा समानार्थी शब्द लिहा/सांगा. 

(23) वधूच्या  तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव काय? 

(24) वराच्या तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव काय? 

(25) वधू वडिलांची कितवी कन्या आहे ?




अध्ययन निष्पत्ती~ (०१) वाचनप्रक्रियेतील घटक जसे-  शब्दबोध, वाचनदिशा, पुनर्दृष्टिक्षेप, दृष्टीचा आवाका, शब्दोच्चारण, आकलन, आस्वादन, शब्दसंग्रह आदी बाबी विचारात घेतात.

(०२) मजकुरातील महत्त्वाचा तपशील समजून घेतात. 

(०३) अक्षरावरील, शब्दावरील नजरेचा आवाका अधिक वाढवून वाचन गतिमान कसे होईल यासाठी वाचनाचा सराव करतात. 

(०४) वाचनाचे महत्त्व लक्षात घेतात.


उपक्रमाची निर्मिती व लेखन~

*संतोष मो. मनवर*

जि.प.उ.प्राथ. शाळा पंचाळा.

No comments:

Post a Comment

****