परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Friday, March 20, 2020

परिचित शब्दाबद्दल माहिती लिहिणे.

उपक्रम~ *परिचित शब्दाबद्दलच्या माहितीचे लेखन करणे/संकलन करणे.*

उपक्रमाचा हेतू~
(०१) तर्कसंगत विचार करण्याची सवय लागणे. (०२) स्वयं अनुभवातून स्वतःची मते लिहिता येणे. (०३) स्वतः लेखन करता येणे.
(०४) समज पूर्वक वाचन करता येणे.
(०५) लक्षपूर्वक श्रवण करणे.
(०६) एकमेकांच्या मताचा आदर करणे.
(०७) एकमेकांची मते विचारात घेणे.

उपक्रमाची कार्यवाही<>
(०१) तीन-चार जणांचा गट करणे.
(०२) गटात प्रत्येक विद्यार्थांना विविध प्रकारच्या परिचित शब्दांची यादी करण्यास सांगावी व त्या यादीमधून कोणताही एक परिचित शब्द निवडावा. जसे- *संगणक, आकाशवाणी, मोबाईल, टि.व्ही, माती, पुस्तक* आदि.
(०३) निवडलेल्या शब्दांची माहिती मिळविण्यासाठी त्या शब्दांच्या संदर्भात गटामध्ये चर्चा करावी. जसे.

माती-- *काळी माती, लाल माती, पांढरी माती, चिकन माती, शाडू माती आदि मातीचे प्रकार आहेत. माती तयार व्हायला खूप वर्षे लागतात. मातीत पिके वाढतात, झाडे वाढतात. मातीत पाणी मुरते. माती पासून मातीची भांडी तयार करतात. घरे बांधण्यासाठी, शेतीसाठी, विटा तयार करण्यासाठी मातीचा उपयोग होतो. पाऊस पडल्यावर मातीमधून सुगंध वास येतो.*

(०४) गटामध्ये संकलित केलेल्या माहितीचे गटातील कोणत्याही एका विद्यार्थ्याने वाचन करून दाखवावे. अशा प्रकारे हा उपक्रम शाळेत घेण्यात यावा.

अध्ययन निष्पत्ती ~
(०१) विद्यार्थी तर्कसंगत विचार करू लागतात. (०२) शब्दसंपत्तीवर प्रभुत्व विकसित करतात. (०३) स्वत:ची मते विशद करतात.
(०४) लेखन करताना विरामचिन्हांची दखल घेतात. (०५) माहिती मिळविण्यासाठी स्वत:हून वाचन व लेखन करतात.
(०६) दिलेल्या शब्दांच्या आधारे अर्थपूर्ण वाक्ये तयार करतात.

लेखन -
संतोष मो. मनवर.
जि.प.उ.प्रा.शाळा पंचाळा

No comments:

Post a Comment

****