परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Monday, March 30, 2020

संख्यावाचनातून प्रश्नोत्तरे.

चला खेळ खेळूया~ *संख्यावाचनातून प्रश्नोत्तरे.*

(०१) १ ते ५०  किंवा १०० पर्यंत संख्या तक्ता तयार करा.
(०२) संख्यातक्त्यावर जेवढी शेवटची संख्या तेवढे त्या त्या इयत्तेच्या व विद्यार्थांच्या अध्ययन क्षमतेनुसार प्रश्न तयार करा.
(०३) दोन दोन विद्यार्थांचा गट करून त्यांना खेळण्यास संधी द्या.
(०४) कोणत्याही एका विद्यार्थास डायस टाकण्यास सांगून जेवढे डायस पडेल तेवढी संख्या घरे पुढे चालण्यास सांगा.जसे~ उदा. समजा डायस पडले चार तर तेवढी घरे पुढे चालून चारच्या घरात गोटी ठेवण्यास सांगा. दुसरा सहकारी त्या क्रमांकाचा प्रश्न विचारेल. प्रश्नाचे उत्तर सांगता आले नाही तर पुन्हा ती गोटी शून्याच्या घरात ठेवण्यास सांगा.
(०५) आता दुसर्‍या सहकार्‍यास डायस टाकण्याची संधी द्या.
(०६) जो सर्वात आधी शेवटच्या घरात जाईल त्याला/तिला विजयी घोषीत करा.
   अशाप्रकारे हा खेळ खेळावा.

संकल्पना व लेखन~ संतोष मो. मनवर.
जि.प.उ.प्रा.शाळा पंचाळा. पं.स. मानोरा

No comments:

Post a Comment

****