आज इयत्ता २री ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व मनोरंजक खेळ घेतला.
खेळाची कार्यवाही पुढील प्रमाणे~
(०१) एक मोठे वर्तुळ आखा.
(०२) वर्तुळाच्या मध्यभागी एक रेषा आखा.(वर्तुळमध्यातून एक व्यास काढा).
(०३) वर्तुळात मध्यावर दोन विद्यार्थी समोरासमोर खेळासाठी उभे करा. खेळासाठी त्यांच्या हातात मोडणार नाही अशी एक काठी द्या.
(०४) दोन्ही विद्यार्थ्यांना हात पुढे करून काठी घट्ट पकडण्यास सांगा. ही काठी मध्यरेषेच्या बरोबर वर धरण्यास सांगा.
(०५) आता सुलभकाने शिट्टी वाजवताच दोन्ही विद्यार्थी (खेळाडू) एकमेकांना ओढत आपल्या मागील वर्तुळाच्या परिघाला छेदून गेलेल्या रेषा पार करण्याचा प्रयत्न करतील.
(०६) जो विद्यार्थी आपल्या प्रतिस्पर्ध्याला काठीसह वर्तुळपरीघाला छेदून गेलेल्या (मागील) रेषेपलीकडे ओढत नेईल तो विजयी ठरेल.त्याला विजयी घोषित करावे.
अध्ययन फलनिष्पती~
(०१) नियमित व विविध खेळातून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखणे.
(०२) शारीरिक कौशल्ये शिकणे.
(०३) विविध प्रकारच्या शारीरिक हालचालीतून आनंद मिळविणे/घेणे.
(०४) शारीरिक सुदृढतेचे घटक, आरोग्य आणि निरामय जीवन याबाबी समजून घेणे.
As we work to create light for others, we naturally light our own way.
लेखन~
संतोष मो. मनवर
जि.प.उ.प्रा.शाळा पंचाळा
No comments:
Post a Comment