मित्रांनो, ३री व ४थी या इयत्तेसाठी मराठी विषयाअंतर्गत *"प्रतिसादात्मक बोलणे"* हा उपक्रम राबविला असता विध्यार्थांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. उपक्रमाचा मुख्य हेतू *चर्चेत सहभागी होणे व आपले स्वत:चे मत विशद करणे/ मांडणे* हा होता.
*आई आपल्यासाठी काय काय करते?* हा विषय गटात चर्चेसाठी दिला व मुलांना गटात प्रथम चर्चा करण्यास सांगितले व नंतर प्रत्येक विध्यार्थांना आईविषयी एक-एक वाक्य फलकावर स्वत:च्या शब्दात लिहिण्यास सांगितले असता मुलांनी सुंदर हस्ताक्षरात आईविषयी खूप चांगली वाक्यरचना तयार केली.
मित्रांनो,बरेचसे परिचित विषय गटात चर्चेसाठी ठेवू शकतो. जसे ~मी पाहिलेली जत्रा, माझी सुंदर शाळा, माझे आवडते शिक्षक, आवडता खेळ आदि.
अध्ययन निष्पत्ती~
(०१) स्वत:चे शब्द स्वत:च्या शब्दात विशद केल्याचा आनंद होणे.
(०२) प्रमाण भाषा व बोलीभाषा यातील फरकाची जाणीव होणे.
(०३) भाषेच्या माध्यमातून विचारांचा विकास होणे. (०४) प्रसंगानुरूप, व्यक्तिनुसार योग्य प्रकारे संवाद साधता येणे.
(०५) आपले विचार, भावना, कल्पना व अनुभव व्यक्त करता येणे.
(०६) लेखनातून आपले विचार व भावना व्यक्त करण्याची आवड निर्माण होणे.
(०७) ज्ञान व आनंद(मनोरंजन) यासाठी अवांतर वाचनाची आवड निर्माण होणे.
(०८) इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकता येणे व सुसंगतपणे लक्षात ठेवणे.
(०९) गटात सहकार्याची भावना व चुकांचे निरसन.
उपक्रमाची उद्दिष्टे~
(०१) अध्ययन प्रक्रिया बालकेंद्रित, आनंददायी व रंजक करणे.
(०२) आनंददायी व कृतियुक्त अध्ययनाद्वारे पोषक वातावरण निर्माण करणे.
(०३) विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी सातत्याने उंचावत ठेवणे.
(०४) विद्यार्थ्यांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय वाढविणे.
(५) सातत्याने प्रत्येक टप्प्यावर मूल्यमापन करणे. (०६) विद्यार्थ्यांनी अपेक्षित क्षमता संपादन केल्या आहेत याची खात्री करणे.
(०७) कृती पूर्ण करताना झालेल्या चुका, आढळलेल्या उणिवा व पूरक मार्गदर्शन आदि संबंधाने चर्चा करणे.
(१०) विद्यार्थ्यांनी स्वत: ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करणे.
(११) विद्यार्थ्यांच्या सहभाग वाढीस प्रेरणा देणे. (१२) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस प्रोत्साहन देणे.
शब्दनिर्मिती~
श्री. संतोष मनवर

No comments:
Post a Comment