गणिती खेळ~ *संख्यांवरील क्रिया.*
खेळाचा हेतू -
(०१) संख्यांचे अचूक वाचन करता येणे.
(०२) संख्येतील एकक, दशक स्थानचा अंक ओळखता येणे.
(०३) दशक, एकक म्हणजे किती हे समजणे.
(०४) सूचनेनुसार संख्यांवर आधारित क्रिया करता येणे हा होय.
आवश्यक साहित्य -
*वर्गस्तरानुसार भरपूर अशी संख्याकार्डे, वही व पेन.*
खेळाची कार्यवाही~
( ०१) दोन-दोन विद्यार्थ्यांच्या जोड्या तयार करा किंवा चार -चार, पाच -पाच विद्यार्थ्यांचे गट तयार करा.
(०२) दोन अंकी, तीन अंकी, ....... संख्या असणारे भरपूर संख्या कार्डे दोघांच्यामध्ये/ गटामध्ये त्यांना न दिसतील असे म्हणजे संख्याचिन्हे असलेला भाग खालून असावा असा ठेवा( त्यामध्ये काही पूर्ण दशक, पूर्ण शतक संख्या असलेली संख्या कार्डे सुद्धा असावीत.)
(०३) कोणत्याही एका विद्यार्थ्यांपासून खेळण्यास सुरुवात करावी.
(०४) त्याला/ तिला संख्या कार्डातील कोणतेही एक संख्याकार्ड उचलण्यास सांगून सूचनेप्रमाणे अंक/ संख्या वहीवर/पाटीवर लिहिण्यास सांगावी. उदा.- समजा त्या विद्यार्थाने ५१ हे संख्याकार्ड उचलले असता त्या संख्येचे वाचन करून घ्यावे. त्यातील एककस्थानचा अंक वहीवर/पाटीवर लिहीण्यास सांगावा.
(०५) त्यानंतर लगतच्या दुसऱ्या, तिसर्या, ....... याप्रमाणे विद्यार्थ्यांना संख्या कार्डातील कोणतेही एक संख्याकार्ड उचलण्यास सांगून पहिल्या विद्यार्थाला दिलेल्या सूचनेप्रमाणेच कृती करून घ्यावी वा कृती करण्यास सांगावी.
(०६) आता पुन्हा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या,......याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला संख्याकार्डातील कोणतेही एक संख्याकार्ड उचलण्याची संधी देऊन आपापल्या पहिल्या अंकाखाली दिलेल्या पहिल्या(च) सूचनेनुसार अंक/संख्या लिहिण्यास सांगावी वा कृती करून घ्यावी. (०७) आता गटातील प्रत्येक विद्यार्थाला आपापल्या अंकांची/संख्यांची बेरीज/वजाबाकी/गुणाकार/भागाकार यापैकी कोणतीही एक क्रिया वा एका वेळी चारही क्रिया करण्यास सांगावी.(वर्गस्तरानुसार कृती अपेक्षित असावी)
(०८) गटातील प्रत्येक विद्यार्थाला त्याचे/तिचे नाव उच्चारून तुझी बेरीज/वजाबाकी/गुणाकार/भागाकार किती आली/आला? कोणत्या दोन अंकांची/संख्यांची बेरीज/वजाबाकी/गुणाकार [.......]आली/आला? असे विचारावे.
(०९) शेवटी ज्या विद्यार्थाची बेरीज/वजाबाकी/गुणाकार/भागाकार सर्वात जास्त येईल त्याला/तिला विजयी घोषित करावे.
याप्रमाणे हा खेळ शाळेत घ्यावा.
टिप~ *संख्येतील दशक म्हणजे उदा.- [(१ दशक असेल तर १०)(२ दशकसाठी २०) (३ दशकसाठी ३०, .......याप्रमाणे पूर्ण दशक संख्या सुध्दा घेऊ शकता.] किंवा पूर्ण दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी, ...... अंकी दोन संख्या, तीन संख्या, ..... संख्या सुध्दा घेऊ शकतो.* (जसे- १०+६०=) (१५+६३+८२=)
संकल्पना व लेखन~
संतोष मो. मनवर
जि.प.उ.प्रा.शाळा पंचाळा.

No comments:
Post a Comment