परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Sunday, March 10, 2019

कविता - 'ती'

                     'ती'
जन्म देण्या बाळाला ती सोसतसे कळ
झेप घेण्या पंखांमधे, देते त्याच्या बळ
कष्टतसे दिनरात,तरी उरी नाही खंत
स्वतःसाठी परि नाही क्षणाची उसंत
संसाराच्या अंगणी ती होतसे मानिनी
लढताना संकटांशी भासे रणरागिणी
झाली आता सजग ती जाणतसे हक्क
कर्तृत्वाने तिच्या झाली दुनिया ही थक्क
जपताना नातीगोती स्थिर ठेवी मती
समाजाच्या विकासाची सूत्रे तिच्या हाती
राखू जरा भान, ठेवू स्त्री शक्तीची जाण
देऊ सदा तिला मान,आज घेऊ मनी आण
स्त्री शक्तीला करूनीया सदैव वंदन
वर्षभरी करू साजरा रोजच महिलादिन !

                       सौ.वर्षा शिंदे
                       उपशिक्षिका



1 comment:

****