Game of Integers.
(पूर्णांक संख्यांचा खेळ)
या खेळाद्वारे मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या पूर्णांक संख्यांच्या बेरीज ,वजाबाकी , गुणाकार व भागाकाराचे नियम पक्के करून सराव घेता येईल. यामध्ये आपण बदलही करू शकता.
हा खेळ खेळण्यापूर्वी काही तयारी करावी लागेल. सर्वप्रथम दोन ठोकळे घ्या. प्रत्येक ठोकळ्याच्या लगतच्या 3 पृष्ठांना हिरवा व तीन पृष्ठांना पिवळा रंग द्या. त्यावर हिरव्या पृष्ठावर धन एक पासून धन सहा पर्यंत संख्या लिहा तर पिवळ्या पृष्ठावर धन एक ते धन सहा अशा संख्या लिहा. लक्षात ठेवा दोन्ही पृष्ठांवर धन आणि ऋण अशा दोन्ही संख्या हव्यात. एका ठोकळ्यावर एक ते तीन धन आणि चार ते सहा ऋण तर दुसऱ्या ठोकळ्यावर एक ते तीन ऋण व चार ते सहा धन संख्या हव्यात.
1) दोन्ही डायस ने एका वेळी खेळा.
2) हिरवे पृष्ठ म्हणजे धन संख्या व पिवळे पृष्ठ म्हणजे ऋण संख्या असल्याने जे अंक पडतील त्याला पूर्णांकांच्या गुणाकाराचे नियम लावून उदाहरण सोडवा व आलेले उत्तर ज्या संख्येवर असाल त्यात मिळवा. उत्तर ऋण आल्यास सोंगटी तेवढी घरे ऋण बाजूकडे सरकवा. तसेच उत्तर धन आल्यास सोंगटी धन बाजूकडे तेवढी घरे सरकवा म्हणजे येथे पूर्णांकांच्या बेरजेचा (किंवा वजाबाकीचाही) नियम वापरा. जो सर्वात आधी ध +104 किंवा -104 वर पोहोचेल तो खेळाडू जिंकेल.
3) खेळत असताना विद्यार्थ्यांना वही वापरू देऊ शकता. यावर तयार झालेली उदाहरणे लिहून ठेवायलाही सांगता येईल.
( याशिवाय तुम्हाला हवे तसे नियम बदलूनही हा खेळ घेता येईल. )

No comments:
Post a Comment