👩🏫 *'माँ'- स्तर !* 👨🏫
देशभक्ती ही काय असे
गुरुजनां कुणी ना शिकवावे !
👩🏫👨🏫👩🏫👨🏫👩🏫👨🏫👩🏫
गुरुच तारक अन संहारक
राष्ट्रउद्धारा मास्तर प्रेरक
संस्कारांचा रस्ता कणखर
नवपिढीचा उमदा चालक
विश्वासाने राष्ट्रसुकाणू
गुरुजनां हाती धरवावे
देशभक्ती ही काय असे
गुरुजनां कुणी ना शिकवावे !
👩🏫👨🏫👩🏫👨🏫👩🏫👨🏫👩🏫
नितीन -संजय शहीद वंदावा
शिवबा अन संभाजी छावा
नामा-तुका अन ज्ञानदेवा
शाहू फुले आंबेडकर जेव्हा
एक मुखे गुणगान करुनी
गुरूंचरणी म्हणे शीर झुकवावे
देशभक्ती ही काय असे
गुरुजनां कुणी ना शिकवावे !
👩🏫👨🏫👩🏫👨🏫👩🏫👨🏫👩🏫
गोरगरीब घरचा विद्यार्थी
चार घास सुखे खात असे
ज्ञान घेऊनि समस्त जगाचे
भारत गुण-गाण गात असे
पाहुनी त्या डोळ्यांतील स्वप्ने
तिरंग्याने अभिमाने डोलावे
देशभक्ती ही काय असे
गुरुजनां कुणी ना शिकवावे !
👩🏫👨🏫👩🏫👨🏫👩🏫👨🏫👩🏫
-श्रीमंत राऊत सर-
म.न.पा.शाळा क्र.47 मुलींची
No comments:
Post a Comment