परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!
Showing posts with label कोडी. Show all posts
Showing posts with label कोडी. Show all posts

Sunday, March 10, 2019

ओळखा भाजी किंवा फळ

ओळखा  भाजी किंवा  फळ 
1 : वाकड्या  छत्रीला काळा फुगा जोडला,
     दो गुणांचा दिसे हा जांभळा  वा काळा ..
2 : आई बाप म्हणजेच हे..
3 : म्हातारीला आवडला लेकीने दिला..
4 : घामोळ्यांनी  भरले  अंगाशी , रूप  मकर परि         चव  नकोशी..
5 : नाजूक  सुंदर  सुबक ठेंगणी , लुसलुशीत ती 
     बाळाची  काकी..
6 : लाल खाता चंद्र अर्धा  राहिला, रूप मोठे     
     अवजड ओझे परि उन्हाळी घरी आला ..
7 : वर रुपासी मी बोचरा व्हिलन प्राण,
     परि अंतर्यामी ही सोनचाफ्यांची खाण!
8 : सुरस मुके हो प्रेमे चोखीत,
     चोखिता रस, मुख हो रसभरीत ..
9 : उखाण्याची भाजी आवडीची,
     परि पित्त कारक व कडवी ही...
10: सुंदर शेलाटी मुलगी म्हणजेच...
11 : काट्याविना ना गुलाब मिळावा ,
        फळावरी मग झाड उगवता हवा हवा       
        रसभरीत स्वादिष्ट ठेवा!
12 :रंग, गंध ना , नाजूक नसता तरीही म्हणते फूल,
       चविष्टतेने नटता सुंदर  पाडी सर्वांना भूल..
13 : नेसली पितांबर तरी अंतरी आहे गोरी..
14 : छोटे पणाला उपमा याची ,
       खेळातला कच्चा गडी हाची..
15 : कंजूषीचा अर्क मी, उन्हाळी प्रदेशात गर्क   
        मी...
16 : पानापानांनी देह हा नटला,
        गोल मटोल देह की हो झाला...

****