परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!
Showing posts with label म्हणी. Show all posts
Showing posts with label म्हणी. Show all posts

Friday, April 19, 2019

म्हणी

1) अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी? 
स्वतःला हवी असलेली गोष्ट, जी दुसर्याच्या आग्रहामुळे करावी लागत आहे असे दाखवणे.
2) अळी  मिळी गुपचिळी.
आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प बसणे.
3) अग माझे बायले, सारे तुला वाह्यले.
बायकोच्या म्हणण्याप्रमाणे वागला, तिला कितीही दिले ,तरी ती ती काय समाधानी राहत नाही.
4) संगोसंगी वडाला वांगी.
एखादी विशिष्ट गोष्ट एकाने दुसरयाला , दुसरयाने तिसरयाला सांगताना शेवटी मूळ गोष्ट बाजूला राहून तिसरेच काहीतरी निर्माण होणे.
5) अंगापेक्षा बोंगा जड.
आहे त्या परिस्थिती पेक्षा जास्त मोठेपणाने मिरवणे.
6) एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारू नये.
समोरच्या माणसाने आपल्याशी बेजबाबदार वर्तन केल्यास आपणही त्याचेच अनुकरण करू नये.7) अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज.
गरजवंताला अक्कल नसते.
8) अति शहाणा त्याचा बैल रिकामा
अति शहाणपणा दाखवायला गेल्यास कुठलेही काम व्यवस्थित होत नाही.शेवटी नुकसानच होते .
9) अंथरूण पाहून पाय पसरावेत
स्वतः च्या आमदनीच्या प्रमाणात खर्च करावा.
10) आंधळं दळतं अन् कुत्र पीठ खातं.
भविष्याचा विचार न करता काम करत रहाणे.
11) आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे
माणसाला आपल्या सर्व गोष्टी चांगल्या वाटतात पण दुसऱ्याच्या गोष्टीत त्याला दोष दिसतात.
12) गुरूची विद्या गुरूस फळली.
लोकांना फसविण्याची युक्ति ज्याला शिकविली त्यानेच याला ( शिकविणाराला ) फसविले.
13) टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण नाही 
कष्ट घेतल्या शिवाय मोठेपणा मिळत नाही.
14) डोगंर पोखरून उंदीर काढणे
कष्टाच्या मानाने अगदीच अल्प मोबदला मिळणे.
15) ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला.
संगतीने दुसऱ्यातील गुण येण्याऐवजी दुर्गुण मात्र घेतले जातात.
16) तण खाई धन.
क्षुल्लक गोष्टी पुढे घात करतात.
17) तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे.
आलेल्या संधीचा फायदा घेणे.
18) तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले.
जास्त फायद्याची आशा धरल्याने थोडासा होणारा फायदाही जातो अन शेवटी नुकसान मात्र होते.
19) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
अंगी पूर्ण बाणलेल्या सवयी जन्मभर जात नाहीत.
20) जी खोड बाळा ती जन्म काळा. 
जन्मजात अंगी असलेले गुण किव्हा दुर्गुण जन्मभर जात नाहीत.
21) जेवीन तर तुपाशी नाहीतर उपाशी. 
मिळाले तर चांगले पाहिजे नाहीतर मुळीच नको.
22) जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
एखादी गोष्ट आपण प्रत्यक्ष करू लागल्याशिवाय त्यामधील अडचणी कळून येत नाहीत.
23) पाण्यात राहून माशाशी वैर कशाला.
समाजात ज्यांच्या सोबत राहायचे आहे त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.
24) ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी.
उपकारकर्त्याच्या बाजूने बोलावे.
25) ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी
एकाच गावातील लोक एकमेकांना चांगले ओळखतात..
26) खाण तशी माती.
आई-वडिलांप्रमाणेच मुले असतात..
27) केळीवर नारळी अन घर चंद्रमौळी.
अत्यंत गरीब परिस्थिती असणे.
28) ज्याचे कुडे त्याचे पुढे.
दुसऱ्याचे वाईट इच्छिणार्याचेच वाईट होते .
29) गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मग मोडून खाल्ली. 
एखाद्या गोष्टीचा उपयोग आपल्या अपेक्षेप्रमाणे झाला तर ठीक,नाहीतर त्याचा अन्य प्रकारे उपयोग करणे.
30) तोबरयाला पुढे ,लगामाला मागे.
फायद्याचा वेळी पुढे पुढे, कामाच्या वेळी मात्र मागे मागे .
31) अडला हरी गाढवाचे पाय धरी.
अडचणीच्या वेळी कुणाचीही मदत घ्यावी लागते.
32) अती केला अनं मसणात गेला.
कुठलीही गोष्ट मर्यादित करावी , अन्यथा तिचा शेवट होतो .
33) वासरात लंगडी गाय शहाणी.
वेड्या लोकात थोडीफार जर बुद्धी असला तरी तो शहाणा समजला जातो .
34) अती तिथं माती.
कुठलीही गोष्ट अति केली कि तिचा शेवट निश्चित.
35) अती राग भिक माग.
जास्त राग केल्याने आपलेच नुकसान होते.
36) दुष्काळात तेरावा महिना.
आधीच संकटात असताना आणखी संकट येणे.
37) आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड घालणे.
स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेणे.
38) आरोग्य हीच धनसंपत्ती.
आरोग्य हीच मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे.
39) ऐकावे जनाचे करावे मनाचे.
लोकांचे मत जाणून घेऊन आपल्या मनाला पटेल तेच करणे.
40) आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे.
41) आ‌ई भाकर देत नाही अन् बाप भीक मागू देत नाही.
 सर्व बाजूने अडचणीची स्थिती  निर्माण होणे.
42) घर पहावे बांधून, लग्न पहावे करून.
अनुभवाने माणूस हुशार होतो.
43) आली अंगावर, घेतली शिंगावर.
जश्यास तसे उत्तर देणे.
44) अपुऱ्या घड्याला डबडब फार.
विद्वत्ता नसताना उगीच बढाया मारणे.
45) असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.
सगळ्या गोष्टी आयते मिळण्याची अपेक्षा करणे.
46) घरघरी मातीच्या चुली.
सगळीकडे सर्वसाधारण एकच परिस्थिती असते.
47) घर फिरले कि घराचे वासेही  फिरतात. 
घरातील कर्त्या माणसावर संकट आले कि , त्याचे आश्रितदेखील त्याच्यावर उलटतात.
48) घरचे झाले थोडे अन व्याह्याने धाडले घोडे.
आपलेच काम आपल्याला भरपूर असताना त्यात इतरांच्या कामाची भर पडणे.
49) चढेल तो पडेल.
ज्याची नुकसान सोसण्याची तयारी असते, तोच शेवटी यशस्वी होतो. प्रयत्न करणाराला एखाद्या वेळी अपयश हे यायचेच.
50) चालत्या गाडीला खीळ.
सुरळीत चाललेल्या गोष्टीत अडथळा येणे.
51) चोराच्या मनात चांदणे.
गुन्हा करणाऱ्याच्या मनात गुन्हा उघडकीस येईल कि काय याची सारखी भीती वाटत असते.
52) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.
प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हातरी चांगले दिवस येतात.
53) जशी देणावळ तशी धुणावळ
आपण जसे दुसऱ्याच्या उपयोगी पडतो तसे दुसरे आपल्या उपयोगी पडतात.
54) कुठे जशी भोग तर तुझ्यापुढे उभा.
ज्या संकटाला आपण भितो तेच संकट आपल्यापुढे उभे राहते.
55) चिंती परा ते येई घरा.
दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली कि आपलेच वाईट होते.
56)लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण.
स्वतःला काही माहित नसताना लोकांना शहाणपणा शिकवणे.
57) असंगाशी संग प्राणाशी गाठ.
दुष्टांशी सांगत फार मोठा घात करू शकते.
58) आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे.
59) उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.
एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्याकरिता काही काल वाट पहावी लागते.
60) उथळ पाण्याला खळखळाट फार.
थोडेसे ज्ञान असलेला माणूस त्याचा गाजावाजा फार करतो.
61) उचलली जीभ लावली टाळयाला.
शक्याशक्यतेचा विचार न करता बोलणे
62) ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
उपकारकर्त्याला फार त्रास देऊ नये, त्यामुळे आपलेच नुकसान होते.
63) उंदराला मांजर साक्ष.
दोघेही एकमेकांचे साक्षीदार.
64) एक घाव दोन तुकडे.
त्वरित निर्णय घेणे.
65) एका हाताने टाळी वाजत नाही.
भांडणात दोष काही एकाचाच नसतो.
66) करावे तसे भरावे.
आपण जशी कृती करतो तसेच त्याचे फळ मिळते.
67) एक न धड भाराभर चिंध्या.
एकाच वेळी अनेक गोष्टी करत राहिल्यास त्यातली एकही गोष्ट चांगली होत नाही.
68) ओळखीचा चोर जीवे न सोडी.
ज्याला आपले वर्म माहित आहे, तोच आपले नुकसान करू शकतो.
69) काप गेले पण भोके राहिली.
अधिकार, संपत्ती जाते, पण त्यावेळाचा अंगी बाणलेला पोकळ अभिमान मात्र कायम असतो.
70) काकडीची चोरी फाशीची शिक्षा
लहानश्या अपराधासाठी फार मोठी शिक्षा होणे.
71) कर नाही त्याला डर कशाला
ज्याने अपराध केला नाही, त्याला शिक्षेची भीती नसते.
72) एका माळेचे मणी
सगळेच सारखे असणे.
73) कडू कारले तूपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच
मुळचीच वाईट असणारी गोष्ट कितीही चांगली करण्याचा प्रयत्न केला, तरी ती चांगली होत नाही.
74) कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
दूर्वर्तनी माणसाच्या कृत्याने एखाद्या चांगल्या कार्याचे नुकसान होत नाही.
75) कामापुरता मामा
गरजेपुरता गोड बोलणारा.
76) काखेत कळसा गावाला वळसा
आपली वस्तू आपल्याजवळच असते, पण लक्षात न राहिल्याने उगीचच तिचा शोध सगळीकडे करणे.
77) कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
मुळचा स्वभाव कधी बदलत नाही.
78) कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.
आपलाच एखादा नातेवाईक आपले नुकसान करतो.
79) कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच
वाईट गोष्टींची कितीही चीकीस्ता केली, तरी त्यातून काहीही चांगले निर्माण होत नाही.
80) कुंपणाने शेत खाल्ले.
रक्षकानेच चोरी करणे.
81) खर्चणाराचे खर्चते, पण कोठावळयाचे पोट दुखते.
देणारा उदार मनाने देतो, पण इतरांना ते पाहवत नाही.
82) खाई त्याला खवखवे.
अपराध्याच्या मनात अपराधाची सतत जाणीव होत असते.
83) गर्जेल तो पडेल काय.
जो तोंडाने नुसती बडबड करतो, त्याच्या हातून काही होईलच याची खात्री नसते.
84) गर्वाचे घर खाली.
जो गर्वाने वागतो त्याचे गर्व कधीतरी नाहीसा होतो.
85) गरज सरो नी वैद्य मरो.
आपले काम झाले, कि मदत करणाऱ्याची पर्वा राहत नाही.
86) गाढवापुढे वाचली गीता.
मुर्खाला कितीही उपदेश केला, तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही.
87) गाड्याबरोबर नळयाची यात्रा.
एकमेकांशी संबधित असलेल्या गोष्टींपैकी एकाची जी स्थिती तीच दुसऱ्याची स्थिती होते.
88) गाढवाला गुळाची चव काय
मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टीचे महत्व कळात नाही.
89) अघळ पघळ अन घाल गोंधळ.
मोठमोठ्या गोष्टी करणारा व्यक्ती कामात आळशी असतो.
90) अचाट खाणे अन मसणात जाणे.
वाजवीपेक्षा जास्त जेवण करीत राहिले तर आपल्याच तब्येतीवर वाईट परिणाम होतो.
91) अटकाव नाही तेथे धुडगूस.
जेथे प्रतिबंध नही तेथे गोंधळ होतो.
92) अटक्याचा सौदा आणि येरझारा चौदा. 
एखाद्या छोट्या कामासाठी उगीचच जास्त मेहनत करावी लागणे.
93) अठरा विश्व दारिद्र. 
अतिशय गरिबी.
94) अडक्याची भवानी, सापिकेचा शेंदूर. 
क्षुल्लक गोष्टीसाठी भरमसाठ खर्च.
95) अति झाले अन आसू आले. 
एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला कि ती दु:खदायी ठरते.
96) अती उदार तो सदा नादार. 
आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला कि सतत आर्थिक चणचण निर्माण होते.
97) अढिच्या दिढि सावकाराची शिडी. 
अडलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो.
98) अस्तुरीचा बात अन इडयाले नको काथ.
 मोठ्यांच्या गप्पाच अधिक असतात.
99) असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा.
अनुकुलता असेल तेव्हा चैन आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी.
100) असेल ते मिटवा , नसेल ते भेटवा. 
जे सहज मिळत असेल त्याला नकार देणे व मिळण्यासारखे नसेल त्याची इच्छा धरणे.
101) असे साहेब किती, सांमटीत हिंडे राती. 
नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो.
102) असून नसून सारखा. 
असला किंव्हा नसला तरी काही फरक पडत नाही.
103) असून अडचण नसून खोळंबा. 
जर सोबत असेल तर तरी त्रास आणि नसेल सोबत तरी त्रास.
104) असतील शिते तर जमतील भुते.
एखाद्या माणसाजवळ पैसा असेल किंवा त्याच्याकडून फायदा होणार असेल तर त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
105) असतील मुली तर पेटतील चुली.
संतती असल्यास हिस्सेवात होतीलच.
106) अल्प बुद्धी, बहु गर्वी.
कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो.
107) अर्धी टाकून सगळीकडे धावू नये.
संबध वस्तू मिळेल या आशेवर अर्धी मिळत असेल तर ती टाकू नये.
108) अर्थी दान महापुण्य. 
गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते.
109) अरे माझ्या कर्मा, कुठे गेला धर्मा! 
आपण चुका करून वर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे.
110) अभी दिल्ली बहुत दूर है!
आपण केलेल्या कामाच्या मानानं खूप काम, खूप काही साध्य करायचं बाकी असणे. 
111)  हपापाचा माल गपापा.
लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते.
112) अपमानाची पोळी, सर्वांग जाळी.
स्वाभिमानी माणूस स्वतःचा अपमान कधीही सहन करीत नाही. 
113) अन्नाचा येतो वास, कोरीच घेते घास.
अन्न न खाणे पण त्यात मन असणे.
114) अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीचा मारलेला वर पाही.
सौम्यपणाने मनुष्य वश करता येतो पण उद्धटपणाने तो आपला शत्रू बनतो.
115) अन्नछत्रात जेवण वर मिरपूड मागणे.
फुकट तर जेवायचे वर पुन्हा मिजास दाखवायची.
116) अन्न तारी, अन्न मारी.
पचेल तेवढे खाल्ले तर शरीर सुदृढ बनते, पण वाजवीपेक्षा जास्त आहार शरीरास अपायकारक असतो.
117) अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये.
अपरिचित माणसाशी फार सलगी करू नये.
118) अनोळखी उपाख्या आणि नऊ पट होम.
अपरिचित माणसाशी केलेल्या व्यवहारात नुकसानच होते.
119) अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली.
अनुभवानेच ज्ञान प्राप्त होते.







****