परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Sunday, March 31, 2019

बोलक्या गोष्टी (41)

 बोलक्या गोष्टी (E- Library Thane)
 परिपाठात या गोष्टी मुलांना ऐकवता येतील.

गोष्टीचे नाव गोष्टीचे नाव
धर्मशाळा मनोराज्य

मन मोठे असावे. गोड शेवट
वाटणी. वृक्षांचे संवर्धन म्हणजे भक्ती.
जशी करणी तशी भरणी. घेवड्याचा वेल.
झाडाची गोष्ट. निर्धार.
दिवस पालटले. देव तारी त्याला कोण मारी.
महिला दिन माहिती मुठभर गहू
अद्दल घडली. खरं बोलणारा मुलगा.
प्रामाणिकपणा कबीराचा शेला
धाग्याचं मर्म आपले कर्तृत्व आपल्या हातात
पाण्याचं मोल संत गाडगे बाबा माहिती
यमुना मिळाली गंगेला ख्रिसमस - माहिती
खरा त्यागी ह्रुदयाची संपत्ती
शाबासकी सावित्रीबाई फुले - माहिती
नवे वर्ष नवे संकल्प दोघांचे भांडण.....
कुत्र्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच जसे आपण तसा आपला देव
सर्वांगीण विचार महत्वाचा रंगापेक्षा अंतरंग महत्वाचे
ढोंगी कोल्हा अति राग आत्मनाश
कृतघ्न मित्र गुरूदक्षिणा
मुलांची परीक्षा गुढीपाडवा- माहिती
स्वर्गाची सफर

चतुर न्यायाधीश



























Tenses - Table

Friday, March 29, 2019

आघात ( कथा) - श्री.कलीम तांबोळी

                     *आघात*
लेखक- कलीम तांबोळी (विद्यानिकेतन क्र. ८) संपर्क- ९९७५३४७५९६.



                आज त्याच्या डोळ्यांतून पुन्हा पाणी येऊ लागलं, आता त्याला याची जणू सवयच झाली होती. त्याचं मन आताशा जरा जास्तच हळवं बनलं होतं. तो स्वतःलाच विचारत होता, 'प्रत्येक वेळी मीच का? सगळी दुःखं सदा माझ्याच वाट्याला का? हाती आले आले म्हणता दर वेळी आनंद माझ्या हातून का निसटून जातो? का का का?' या प्रश्नांनी तो इतका हैराण झाला की त्याला कुठेतरी डोकं आपटावसं वाटायला लागलं. डोकं एकदम जड झालं त्याचं. काय करावं त्याला सुचेना. इतक्यात त्याला कुणीतरी हाक मारली.
                  त्यानं स्वतःला सावरलं, डोक्यातल्या विचारांचे मोहोळ झाडून टाकलं आणि त्यानं आवाजाच्या दिशेनं बघितलं... कोण? अरे ही तर तृप्ती! ही इथे कशी? आणि इतक्या दिवसांनी हिनं मला अचूक कसं काय ओळखलं? कमालय...विचारांच्या तंद्रीत तो तृप्तीच्या समोर उभा राहिला, तृप्तीने त्याच्या नजरेतील प्रश्न वाचले की काय माहीत नाही पण तिने त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली... तिची नुकतीच इकडं बदली झालेली आणि ती आज रुजू व्हायला आली होती. कुणी ओळखीचं दिसतंय का म्हटलं तर तिला अचानक हाच दिसला! याच्या डोक्यातल्या प्रश्नांचा भुंगा मेंदू पोखरून सध्या तरी शांत बसला होता. पण त्यानं मेंदू पोखरल्यानं झालेल्या वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. तृप्तीला ते जाणवलं की नाही काय माहीत! दोघे बोलत उभेच होते. जरा भानावर येत तो तृप्तीला म्हणाला, ''थांब जरा, आलोच.'' तृप्तीला आपला हा असा चेहरा दिसू नये म्हणून तो तोंड धुवायला जात होता! काय विचित्राय ना माणूस? तोंड धुवून मनातले विचार पुसायचा प्रयत्न करतो! ते पुसले जातीलच या भाबड्या आशेनं! खरेतर त्याला मनोमन तृप्तीनं विचारावं असं वाटत होतं, हिच्याजवळ आपलं मन मोकळं करावं, आणि मनावरचं ओझं कमी करावं असा विचार त्याच्या मनात आला, पण दुसऱ्याच क्षणी त्यानं विचार केला की, आपणच आपले प्रश्न सोडवायला हवेत, का इतरांना सांगून त्यांची डोकेदुखी आपण वाढवावी? त्या व्यक्तीला जर आपली काळजी असेल तर आपल्यामुळे तीही काळजीत पडेल! त्यापेक्षा नकोच!
                    दोघे कॅन्टीनमधे आले. चहा हा त्याचा वीक पॉईंट होता, मस्त वाफाळलेला चहा आणि भजींची ऑर्डर देऊन दोघे एका टेबलावर बसले. तृप्तीनं बोलालयला सुरुवात केली.
"तू इथं आहेस हे माहीत होतं, पण आपली भेट इतक्या लवकर होईल असं नव्हतं वाटलं."
तो हसला, म्हणाला,
"काही भेटी आणि विरह आपल्या हातात नसतात."
आपण पुन्हा त्याच विचारांच्या गर्तेत जात आहोत याची जाणीव होताच त्यानं विषय बदलण्यासाठी तिला विचारलं,
"तू कॉलेज कट्टा ग्रुपवर नाहीस ना? नंबर दे मी ऍड करतो."
ती म्हणाली, "नाही रे बाबा, मी साधाच मोबाईल वापरते. मला नाही आवडत ते फेसबुक अन व्हाट्सअप." ही कोणत्या काळात जगतीये, अशा अविर्भावात त्यानं तिच्याकडं बघितलं, त्याच्या नजरेतला प्रश्न समजून ती खुदकन हसली. आणि म्हणाली
" गंमत केली रे. घे नंबर."
त्यानं नंबर घेतला आणि लगेच ग्रुपवर ऍड करून तिचं वेलकमही केलं.. त्या वेळी जे जे ऑनलाईन होते, त्या सगळ्यांनी मला वेलकम चे मेसेज टाकले..
ती म्हणाली,
"बघ आता, आपण दोघे एकमेकांच्या समोर बसलोय, इतक्या दिवसांनी भेटलोय पण तू मला वेलकम केलंस ते व्हाट्सअप वर! आपल्याला या व्हाट्सअप ने जवळ आणलंय की दूर केलंय?"
जवळ आणि दूर
जवळ आणि दूर
भेट आणि वियोग
भेट आणि वियोग....
गोल गोल गोल गोल गोल गोल... पाण्यातला भोवराच... पोहता येणाराही एकदा भोवऱ्यात सापडला की... खेळ खल्लास!
"नाही नाही! "
त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले..
"काय रे? काय नाही नाही?"
भानावर येत तो म्हणाला,
"नाही गं मी म्हणालो तंत्रज्ञान आहे ते, त्याचा वापर आपणच खुबीने करायला हवा."
दोघे बराच वेळ बोलत होते, दोन दोन वेळा चहा घेऊन झाला होता.....

ती दोघे बराच वेळ कॅन्टीन मध्ये बसून बोलत होते. पार कॉलेज पासून ते आत्ताच्या आयुष्यापर्यंत ते भरभरून बोलत होते ... निदान तृप्ती तरी बोलत होती.. तिच्या सुखी आयुष्याविषयी तिला किती सांगू नि काय करू असं झालेलं. हा ऐकत होता, मधेच मानेनं, कधी शब्दानं होकार-नकार देत होता.. थोड्या वेळानं ही गोष्ट तृप्तीच्या लक्षात आली, आणि ती म्हणाली,
"अरे ,कधीची मी एकटीच बडबडतीये, तुझं काय? तुझ्याबद्दल सांग ना."
समुद्रातून जाताना, अचानक वादळ यावं आणि त्या खवळलेल्या समुद्रात आपल्याला कुणीतरी लोटून द्यावं. निळंभोर पाणी अचानक काळंभोर व्हावं, ते नाकातोंडातून भसाभसा फुफ्फुसात जावं.. श्वास अडकावा, जीव गुदमरावा.. हातपाय हलवून जीव वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा, हळूहळू भान हरपू लागावं... संपलं सगळं... आणि अचानक डोकं भसकन पाण्याबाहेर यावं.... त्याची अशीच अवस्था आत्ता झालेली. एवढा वेळ हृदयात दाबून ठेवलेला ज्वालामुखी अचानक उफाळला आणि तो ढसाढसा रडायला लगला. तृप्तीला क्षणभर काय होतंय कळेच ना. तिला याची अपेक्षा तर बिलकुलंच नव्हती. याला आता शांत कसं करावं तिला कळेना. तिला वाटलं याचा आवेग संपू द्यावा, नकोच थांबवायला याला. काही वेळाने हा भानावर आला.
"सॉरी"
आणि उठून बेसिनकडे गेला, तोंडावर सपासप पाणी मारलं, पुन्हा मनातली घालमेल धुण्याची वृथा खटपट! पण आता तृप्तीला सगळं सांगावं लागणार होतं. एका अर्थी त्याच्या मनासारखं झालं.
तो पुन्हा तृप्तीजवळ आला.
तृप्ती म्हणाली,
"बरं वाटतंय ना?"
"हो."
"चल जरा बाहेर जाऊ मोकळ्या हवेत. इथे एखादी बाग आहे का? आपण तिथेच बसू थोडा वेळ..."तृप्ती.
"चालेल, इथे आहे एक बाग... "तो.
दोघे रिक्षाने बागेत आले.
संपूर्ण प्रवासात दोघेही शांत होते.
काय विचारायचं हे तृप्ती ठरवत होती, आणि सुरुवात कोठून करायची याची जोडणी त्याच्या मनात चालू होती.
एका झाडाखालच्या बाकावर दोघे बसले..
"हं.. बोल आता, नक्की झालंय काय?  "_ तृप्ती
"नक्की सुरुवात कोठून करावी कळत नाहीये. " तो
"सुचेल तिथून कर."   _  तृप्ती
"तृप्ती ,अगं मी नोकरीच्या बाबतीत तुमच्यापेक्षा जरा कमनशिबी ठरलो. मला खूपच उशीरा जॉयनिंग मिळाली. या कालावधीत मी अत्यंत खचलो होतो. मला कुणाचाच आधार नाही असं वाटायचं. आयुष्यात एक प्रकारची पोकळी असल्यासारखं वाटायचं. आपलं कसं होईल या विचाराने रात्र रात्र झोप लागायची नाही.. नोकरी कधी मिळेल याची खात्री नसल्याने मी शिकवणी घेण्यास सुरुवात केली. शिकवणीत मन रमायचं. हळूहळू मुलांची संख्या वाढायला लागली आणि मला सहायकाची गरज जाणवू लागली. मी दोन चार जणांना त्याविषयी सांगून ठेवलं. एकेदिवशी एक मुलगी माझ्याकडे शिकवण्यासाठी आली. पहाताक्षणी नजरेत भरावी अशी होती ती! त्या वेळी तिला नोकरीची गरज होती अन मला सहायकाची. तिला दुसऱ्या दिवशी बोलावलं आणि एक भाग शिकवायला सांगितला, तिने तो छानच शिकवला. मी तिला नोकरी दिली. आता मी अजून एक खोली भाड्याने घेतली, एका वेळी दोन वर्ग चालत. वेळापत्रकानुसार सगळं चाललेलं. ती मला सर म्हणे. माझ्याशी जरा कमीच बोलायची. आणि तेही अगदी अदबीने."
"तू तिच्यावर प्रेमबीम करू लागलास की काय? " _ तृप्ती.
"सांगतो ना."
एके दिवशी क्लास संपल्यावर मी तिला थांबायला सांगितलं. ती थांबली. मी या वेळी तिला ठरल्यापेक्षा हजार रुपये जास्तीचे दिले, आणि तू छान शिकवत असल्याने आपल्याकडे मुलांचे अॅडमिशन वाढले आहे, आणि त्यामुळे मी तुझा पगार वाढवतोय म्हणून सांगितलं. ती खूप खुश झाली. मला धन्यवाद देऊन ती निघून गेली. आताशी माझ्या डोक्यात तिच्याबद्दल जास्तच विचार येऊ लागले होते. ती सारखी समोर असावी असं वाटायचं. मला प्रेम झालं होतं. तिने जर होकार दिला तर तिच्याशी मी लग्नच करायचं ठरवलं.... पण मी अजून तिला विचारलं नव्हतं, ती काय म्हणेल मला माहित नव्हतं. मनात मांडे खाणं  योग्य नाही म्हणून उद्याच तिला विचारायचं ठरवलं.
दुसऱ्या दिवशी मी जरा लवकर क्लासवर गेलो. ती यायला अजून अवकाश होता. साधारण अजून पंधरा मिनिटे. पण मला हा एवढासा वेळ युगांसामान वाटायला लागला. मिनिटा मिनिटाला मी घड्याळ बघत होतो. पण वेळ तिच्याच गतीने पुढे सरकत होती. आणि अचानक ती समोरून येताना दिसली. माझ्या काळजाचा ठोका वाढला, मी काय बोलायचं हे ठरवलंच नव्हतं! ऐनवेळी शब्द शोधायला लागलो, ते जुळवायला लागलो. ती आली. मला गुड मॉर्निंग म्हणून वर्गात गेली. मी तिला रिप्लाय दिलाच नाही. भानच नव्हतं मला. मी नकळत तिच्या मागे वर्गात गेलो. ती म्हणाली,
"काही काम आहे का सर?"
"अं? हो... म्हणजे हेच की सिलॅबस किती झालाय? आपण चाचणी घ्यायला हवी."
"अहो सर, मागच्या आठवड्यात घेतली की चाचणी आपण. "_ ती.
"ओह, सॉरी. विसरलोच होतो मी."
इतक्यात मुले आली म्हणून मी निघालो.
"सर काही काम असेल तर थांबते क्लास झाल्यावर.. "_ ती
मी हो म्हणालो.
शिकवण्यात लक्षच लागेना. काय बोलायचं याची मनात जुळवाजुळव केली, आणि मनातल्या मनात उजळणीही केली.
क्लास सुटल्यावर ती माझ्याच वर्गात आली.
"बोला सर."
मी सरळ विषयालाच हात घातला..
"तू मला आवडतेस. मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझ्याशी लग्न करायचंय. तुझा निर्णय तू सांग."
एका दमात सगळं सांगितलं... ती शांतच होती. तिच्या चेहऱ्यावर नेमके भाव कोणते आहेत हे कळतच नव्हतं.. किती वेळ गेला मला कळलं नाही. मी खाली मान घालून बसूनच होतो.. मी वर पाहिलं तेव्हा ती माझ्याकडेच बघत होती. मी तिच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही. मी दुसरीकडे बघायला लागलो.. ती म्हणाली,
"मला काहीच कळेनासं झालंय. हे स्वप्न की वास्तव काय माहीत. मी आता घरी जाते. तुमचं उत्तर तुम्हाला उद्या मिळेल."
ती निघून गेली.
मी विचार करत तिथेच बसून होतो.... किती तास आठवत नाही.
               दुसऱ्या दिवशी मी जरा धाकधुकीतच क्लास गाठला. तिला माझं विचारणं आवडलं की नाही? ती काय विचार करेल माझ्याबद्दल? तिने जर मला नकार दिला तर आपण काय प्रतिक्रिया द्यावी? आणि होकार दिला तरी काय करावं? रात्रभर असे अनेक विचार मला छळत होते, मी फक्त कूस बदलत होतो, झोप नाहीच. ती आली. नेहमीप्रमाणे मला गुड मॉर्निंग म्हणून क्लास मध्ये गेली! अरे! मला इथे रात्रभर झोप नाही, विचारांनी पार डोकं फुटायची वेळ आलेली, आणि ही? अशी कशी? हिने काही विचार केलाय की नाही? नाहीच बहुतेक. नाहीतर ही अशी वागली नसती.. नकार असता तर ही हसून गुड माँर्निंग नसती म्हणाली. मग होकार असेल. पण मग लाजली कशी नाही.. पुन्हा विचार.. पुन्हा चक्र..गोल गोल..
 "अरे, मुली अशाच असतात, त्यांच्या मनाचा अंदाज सहजासहजी नाही बांधता येत." तृप्ती हसून म्हणाली.
"अगं हो ना... त्या दिवशी माझे मन कशातच लागेना. कधी क्लास सुटतोय असं झालेलं. मधल्या वेळात एकदा ती माझ्या वर्गात येऊन खडू घेऊन गेली. चेहरा तसाच...
क्लास सुटला. ती माझ्या वर्गात आली. मीच लाजलो. मला तिच्याकडे बघावेच वाटेना. ती म्हणाली,
"बोला सर."
"मी काय बोलू? तूच बोल ना. काल म्हणाली होतीस आज सांगणार म्हणून."
"हो, सांगणार ना."
असे म्हणून तिने मला गुलाबाचे एक टपोरे फूल दिले. गुलाबी.
बस? मिळाले उत्तर.
"हे... हे म्हणजे काय? शब्दात नाही सांगता येत का?
नाही. काही भावना शब्दात व्यक्त करू नयेत माणसाने. त्या भावना आपल्या शब्दांच्या पलीकडल्या असतात. त्यांना शब्दात पकडू म्हणता, त्या फिक्या पडू शकतात. सो, नो वर्ड्स."
मला वाटलं
काय भारी आहे यार ही.. खूप छान बोलते. हिने बोलत राहावं आणि मी ऐकत राहावं असं वाटत होतं. पण ही वेळ आणि जागा योग्य नव्हती. तिला म्हटलं आता तू जा, मी फोन करिन तुला बोलू आपण.
काय गंमत असते नाही? आपले काहीच नसते ना, तेव्हा आपल्या मनात पण काहीच येत नाही! पण आपल्यात जेव्हा नातं बनतं तेव्हा मात्र आपल्याला कुणी बघेल का? कुणी काही बोलेल का? उगीच मनात विचार येतात. "
तो हसला, अगदी खळखळून हसला, तृप्तीलाही बरं वाटलं.
तेव्हा दोघांकडेही साधे मोबाईल होते, व्हाट्सऍप चा अजून शोधही लागलेला नव्हता आणि मोबाईलवर इंटरनेट ही परवडणारी गोष्ट नव्हती. फोनवर खूपच कमी बोलणं व्हायचं.
हळूहळू आम्ही दोघे एकमेकांत गुंतत गेलो. आणाभाका झाल्या, एकमेकांना कधीही सोडणार नाहीच्या शपथा झाल्या. भेटायचं असल्यास आम्ही पुण्यातच येत असू.
त्या दिवशी आम्ही दोघे गणपतीच्या दर्शनाला गेलेलो. मनोभावे दर्शन घेतले, त्याला म्हणालो, बाप्पा बास! आता काही नको. आज मी तुझ्याकडे काहीही मागणार नाही. माझ्याकडून तुला आज सुट्टी.
ती खूप वेळ डोळे मिटून होती. काय मागितलं म्हणून विचारलं तर ते सांगायचं नाही म्हणाली..
आमचं नातं बहरत होतं
फुलत होतं..
दोघेही खूप आनंदात होतो.
तिच्या परीक्षा संपल्या की ती गावाला जात असे. यावेळीही गेली. नियमित फोनवर बोलणं व्हायचं. तिला गावी जाऊन चार पाच दिवस झाले. आणि एक दिवस ती आजारी असल्याबाबत तिने मला सांगितलं. नेहमीप्रमाणे, काळजी घे, डॉक्टर ला दाखव म्हणून झाले. रोज तिचा फोन यायचा. तिचा आजार जास्तच बळावला होता. तिची सगळी सुट्टी आजारपणातच गेली. माझी अवस्था प्रचंड वाईट झालेली, जेवणही जात नव्हते नीटपणे... माझी तब्येतही खालावली होती.... दिवस जात होते. तिच्या सुट्या संपल्या आणि ती पुन्हा क्लासमधे यायला लागली. पण तिच्यात काहीतरी बदल झाला होता. ती माझ्याशी नीट बोलत नव्हती. चिडचिड करायची. तिला पटकन राग यायला लागला होता. मी समजून घेत होतो..
"प्रेमात असं होतं रे. असा पॅच येतोच कधीतरी प्रत्येकाच्या नात्यात." _ तृप्ती.
हो. मी असाच विचार करून पुढे विषय वाढवत नव्हतो.
आणि अचानक एक दिवस ती मला म्हणाली.
"आपण लग्न करण्याचा विचार केला होता, करुही आपण. पण लग्न झाल्यानंतर अनेक गरजा असतात, त्या आपण कशा भागावणार? आपल्या या एवढ्याशा क्लासवर नाही चालणार आपला संसार."
"तू आज अचानक असं का बोलत आहेस? माझं काही चुकलं असेल तर तसं सांग.
चुकलं नाही. पण मी जरा प्रॅक्टिकल विचार करतीये."
"बरं. मग तुझ्या मते आपण काय करायला हवं?
तुमचं मला नाही माहीत पण मी मात्र काय करायचं ते ठरवलंय."
"काय ते?"
"माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक मुलगा बघितला आहे. त्याला मी आवडले आहे."
"आणि तुला?"
"मलाही तो आवडला आहे....."
डोक्यात दगड पडल्यावर काय होतं याचा अनुभव मी घेत होतो. मला पुरेसा विचार करायला वेळही न देता ती म्हणाली,
"मला विसरून जा. आणि प्लिज मला यापुढे फोन करू नका....."
ती निघून गेली.
रेशीमकीडा....
हं! रेशीकिड्याचं मन त्या तुतीच्या पानावर येतं, तो ते पान खायला लागतो. त्याच्यातून रेशमाच्या तारा निघतात, त्या याच्याच भोवती कोष तयार करतात. याला जाणीव होते की आपण पाने खात असल्याने आपल्याभोवती हा कोष बनतोय, यात आपण कायमचे अडकू! त्याला माहित असतं सगळं! पण ... प्रेमापोटी तो खातच राहतो. शेवटी एक वेळ अशी येते की तो त्या कोषात बंदिस्त होतो, सगळीकडे अंधार, ना पान ना प्रेम... एकटाच... आता त्याच्या सोबत असते फक्त चिरनिद्रा! त्याची सुटका फक्त मरणानेच! कारण हा कोष त्याने स्वतःच इतका घट्ट केलेला असतो की त्याला स्वतःलाही त्यातून बाहेर पडता येत नाही... मी रेशीमकीडा!
ती गेली.
माझ्या हृदयात प्रचंड पोकळी निर्माण करून गेली...
निव्वळ स्वार्थापोटी ती निघून गेली...
सगळी स्वप्न, आणाभाका खोट्या...
प्रेम खोटं...
ओल्या कोरड्या भावना खोट्या...
ती खोटी! खरंच? ती खोटी?
मग खरं काय? नाही! काहीच खरं नाही....
विचारांचं आग्यामोहोळ डोक्यात घुमायला लागलं. त्या माशा मेंदूला कचाकच चावायला लागल्या...
डंख.. मेंदू.. मेंदू .. डंख..
.
.
.
.
आता तृप्तीच्या डोळ्यात आसवं दाटी करू लागलेली, त्यापैकी एक चुकार थेंब तिच्या गालावर ओघळला. ती भानावर आली.
"सॉरी. बोल पुढे."
"मी कधी सावरलो नेमका आता मला नीट आठवत नाही. पण आता आपणही स्वतःचाच विचार करायचा असं ठरवलं होतं मी. तिचा विचार मधेच डोकं वर काढी आणि मी अस्वस्थ व्हायचा.. पण ती मला कधीच विसरली असेल म्हणून मग मीही तिचा विचार मनातून झटकून टाकायचो...
वर्षे सरली. या गोष्टीला दहा वर्षांचा काळ लोटला.
या काळात मला नोकरी लागली.
चांगला स्थिरस्थावर झालो. गाडी घेतली. पण गाडीतून कुठेही जाताना शेजारची मोकळी जागा सलते हृदयात... आजही!
मग ठरवलं, आता तिला शोधून काढू. आणि आपला रुबाब दाखवू. माझेही दिवस पालटले, जरा तिला शरम वाटते का पाहू. शोधायचा प्रयत्न केला... खूप खूप प्रयत्न केला... तिच्या कॉलेजच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. पण कुणीच काही सांगू शकलं नाही. ती ज्या कॉलेजमध्ये होती, तिथे माझा मित्र आहे. त्याला सांगून कॉलेजच्या जुन्या रेकॉर्डमध्ये काही सापडतंय का बघायला सांगितलं. तिथून तिच्या घरचा पत्ता मिळाला.. एक दिवस मी तिथे जायचं ठरवलं. तिथे हिच्याविषयी नक्की कळेल!
गेलो.. घरी एक लहान मुलगा खेळत होता.
कदाचित हिचाच असेल.
आली असेल माहेरी.
बरं झालं!
पाहू ओळखते का..
मी आत गेलो. बहुतेक तिचे वडील असावेत, ते पेपर वाचत बसले होते. मी नमस्कार केल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहून नमस्कार केला आणि पेपर खाली ठेवला. मी ओळख करून दिली. त्याबरोबर ते रडायलाच लागले! अरे! हे एक नवीनच! मला काय करावं सुचेना. मी त्यांच्या बाजूला जाऊन बसलो आणि त्यांना आधार दिला, मला काहीच माहीत नसताना माझ्याही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं... थोड्या वेळाने ते शांत झाले. घरी अजून कुणीच नव्हतं. त्यांनी मला पाणी दिलं. घोटभर पाणी तोंडात घेतलं पण ते मला समुद्राएव्हढं वाटायला लागलं.. काय झालं असेल नेमकं. ती कुठे आहे? मला तिला भेटायचंय..."
बाबांनी सांगायला सुरुवात केली.
"मला तिने तुमच्याबद्दल सांगितलं होतं. मी तिला शिक्षण संपल्यावर बघू आणि मुलगा चांगला असेल तर माझी काहीच हरकत नाही असं सांगितलं होतं. खूप खुश होती.
बाबा, तुम्हाला ते शंभर टक्के आवडणार म्हणायची! खूप कौतुक करायची तुमचं.
बिन आईची ती लेक.. मी तिला खूप जपायचो. तिला कसलाही त्रास मी होऊ द्यायचा नाही..
ती एका सुट्टीला इकडे आली होती.
मैत्रिणीसोबत तिच्या शेतावर गेलेली.
तिथून परतत असताना आमच्याच नात्यातील एका पोरानं तिला अडवलं... आणि..."
बाबांचा बांध पुन्हा फुटला.
आता मीही माझ्यातला समुद्र मोकळा केला..
बाहेरचं ते लेकरू आत आलेलं. ते भांबवून आमच्याकडे बघत होतं.
हा?
तिचाच!
मी उठून त्याला जवळ ओढलं. घट्ट मिठी मारली आणि....
बाबा सांगत होते.
"तिथून पुढे ती खूप खचली. मी तुमच्याशी लग्न करायचा सल्ला दिला तर म्हणाली नाही.. मला त्यांना फसवायचं नाही.. "
"अगं पण त्यांना सांगणार काय तू?"
"बघू काहीतरी."
"एक दिवस तिच्या पोटात खूप दुखायला लागलं. दवाखान्यात नेलं तेव्हा हिला दिवस गेल्याचं कळलं! मला तर कुणीतरी उचलून आपटल्यासारखं झालं. डोक्यात फक्त मुंग्या! आसपासचं काहीच भान नाही.. "
तिला मी म्हणालो.. "हे मुलं....."
"हवंय मला बाबा."
"काय??"
"हो."
"बोलणं बंद...
मग एके दिवशी ही तुमच्याकडे आली. काय सांगितलं माहीत नाही. पण दोन दिवस खोलीतून बाहेर नाही आली. नुसती रडत होती. मी तिला खूप समजावलं. ती मला म्हणायची हे एक दिवस मला शोधत इथे नक्की येतील. तेव्हा त्यांना ही डायरी द्या वाचायला." ती सारखी डायरी लिहीत असे. आम्ही तिच्या खोलीत होतो. बाबांनी कपाटातून तिची डायरी काढून मला दिली.
मी म्हणालो..
"हो बाबा, पण ती कुठाय?
मला भेटायचंय तिला. माझ्यावर इतका अविश्वास का दाखवला? मी तिला स्वीकारलं असतं. माझ्या प्रेमाची कुचेष्टा का केली तिनं? मला तिला जाब विचारायचाय. कुठे असते ती आता? मला आत्ताच्या आत्ता तिच्याकडे घेऊन चला. मी या मुलासह तिचा स्वीकार करीन.. बाबा.."
बाबांचे डोळे आता कोरडे झालेले. ते इतकंच बोलले..
"ती आता आपल्यात नाहीये."
.
.
.
हा आघात प्रचंडच होता...
.
.
.
डायरीचं एक पान..

" मी तुला असं अरेतुरे बोलावं असं तुला सारखं वाटायचं ना! घे तुझी इच्छा पूर्ण करतीये! आणि आता जरा हस पाहू. मी तुला खूप दुःख दिलंय. माझ्याही वेदनांना अंत नाही रे..
ऐक.. आपण ज्या बागेत जायचो ना, तिथे जा. आणि तिथेच पुढचं पान वाच."

" तो समोर फुलांचा ताटवा आहे ना? मस्त टवटवीत टपोरी फुलं! जा त्या ताटव्यात.. त्या ताटव्यात जा आणि त्यातलं एक सर्वात सुंदर, तुला मनापासून आवडलेलं फूल घेऊन ये... पण एक अट आहे, ती कसोशीनं पाळायची बरं का! एकदा का तू पाऊल पुढे टाकलंस की पुन्हा मागे यायचं नाही.. पुढेच जायचं. जा. उठ फूल घेऊन ये..."

मंतरल्यासारखा मी उठलो, ताटव्यात शिरलो..
कित्ती कित्ती सुंदर फुलं होती!
मनमोहक! आकर्षक! आणखी खूपच काही.
हे एक प्रचंडच आहे! यातलं फक्त एक निवडायचं?
कोणतं? कोणतं घेऊ?
हे? अंहं, ते?
नको नको ते पुढचं घेऊ!
ताटवा संपला!
.
.
.
आता शेवटी राहिली होती काही कोमेजलेली फुले!
मला आता यातलंच एक निवडायचं होतं.
मी त्यातल्या त्यात बरं फूल निवडलं आणि आलो.
.
.
.
.

" आयुष्य हे असंच असतं!"
.
.
.
.
आता मी आणि तृप्ती दोघेही मनसोक्त रडत होतो...
                            समाप्त.

Wednesday, March 27, 2019

Opposite words.


  1. about × exactly
  2. above × below
  3. absence × presence
  4. abundance × lack
  5. accept × refuse
  6. accidental × intentional
  7. active × lazy
  8. add × subtract
  9. admit × deny
  10. adult × child
  11. advanced × elementary
  12. affirmative × negative
  13. afraid × brave
  14. after × before
  15. against × for
  16. alike × different
  17. alive × dead
  18. all × none
  19. allow × forbid
  20. already × not yet
  21. always × never
  22. ancient × modern
  23. ancestor × descendant
  24. agree × refuse
  25. amateur × professional
  26. amuse × bore
  27. ancestor × descendant
  28. angel × devil
  29. animal × human
  30. annoy × satisfy
  31. answer × ask
  32. answer × question
  33. antonym × synonym
  34. apart × together
  35. approximately × exactly
  36. argue × agree
  37. arrest × free
  38. arrival × departure
  39. arrive × depart
  40. artificial × natural
  41. ascent × descent
  42. ask × answer
  43. asleep × awake
  44. attack × defend
  45. attack × defence
  46. attic × cellar
  47. autumn × spring
  48. awake × asleep
  49. awful × nice
  50. back × in front of
  51. background × foreground
  52. backward × forward
  53. bad × good
  54. bad luck × fortune
  55. beauty × ugliness
  56. before × after
  57. begin × end
  58. beginning × end
  59. behind × in front of
  60. below × above
  61. best × worst
  62. better × worse
  63. beautiful × ugly
  64. big × small
  65. birth × death
  66. bitter × sweet
  67. black × white
  68. blunt × sharp
  69. body × soul
  70. bore × amuse
  71. boring × exciting
  72. borrow × lend
  73. bottom × top
  74. boy × girl
  75. brave × cowardly
  76. break × fix
  77. broad × narrow
  78. brother × sister
  79. build × destroy
  80. busy × lazy
  81. buy × sell
  82. calm × excited
  83. careful × careless
  84. careless × careful
  85. catch × miss
  86. ceiling × floor
  87. cellar × attic
  88. centre × outskirts
  89. certainly × probably
  90. changeable × constant
  91. cheap × expensive
  92. child × adult
  93. children × parents
  94. clean × dirty
  95. clear × cloudy
  96. clever × stupid
  97. close × open
  98. closed × open
  99. cloudy × clear
  100. cold × hot
  101. cold × heat
  102. come × go
  103. comedy × drama
  104. complicated × simple
  105. compliment × insult
  106. compulsory × voluntary
  107. connect × separate
  108. consonant × vowel
  109. constant × changeable
  110. construction × destruction
  111. continue × interrupt
  112. cool × warm
  113. correct × wrong
  114. courage × fear
  115. courageous × cowardly
  116. cowardly × brave
  117. create × destroy
  118. cruel × human
  119. cry × whisper
  120. cry × laugh
  121. damage × repair
  122. danger × security
  123. dangerous × safe
  124. dark × light
  125. daughter × son
  126. dawn × dusk
  127. day × night
  128. dead × alive
  129. death × birth
  130. deep × shallow
  131. defeat × victory
  132. defence × attack
  133. defend × attack
  134. delicious × awful
  135. deny × admit
  136. depart × arrive
  137. departure × arrival
  138. descendant × ancestor
  139. descent × ascent
  140. desperate × hopeful
  141. destroy × build
  142. destruction × construction
  143. devil × angel
  144. dictatorship × republic
  145. die × live
  146. different × alike
  147. difficult × easy
  148. dirty × clean
  149. disease × health
  150. distant × near
  151. divide × unite
  152. division × unity
  153. divorce × marry
  154. divorce × marriage
  155. divorced × married
  156. domestic × foreign
  157. down × up
  158. downstairs × upstairs
  159. drama × comedy
  160. dry × humid
  161. dull × interesting
  162. dusk × dawn
  163. early × late
  164. east × west
  165. easy × difficult
  166. elementary × advanced
  167. emigrate × immigrate
  168. emigration × immigration
  169. empty × full
  170. end × begin
  171. end × beginning
  172. ending × beginning
  173. enemy × friend
  174. enjoy × hate
  175. enter × leave
  176. entrance × exit
  177. equal × different
  178. even × odd
  179. evening × morning
  180. everybody × nobody
  181. everything × nothing
  182. exactly × approximately
  183. excited × calm
  184. exciting × boring
  185. exclude × include
  186. exit × entrance
  187. expensive × cheap
  188. export × import
  189. exposure × shelter
  190. extreme × moderate
  191. fail × succeed
  192. failure × success
  193. false × true
  194. far × near
  195. fast × slow
  196. fat × slim
  197. fear × courage
  198. female × male
  199. few × many
  200. final × first
  201. find × lose
  202. finish × begin
  203. finish × start
  204. first × final
  205. fix × break
  206. flat × hilly
  207. floor × ceiling
  208. follow × lead
  209. forbid × allow
  210. for × against
  211. foreground × background
  212. foreign × domestic
  213. foreigner × native
  214. forget × remember
  215. form × destroy
  216. fortune × bad luck
  217. forward × backward
  218. free × arrest
  219. freeze × melt
  220. frequently × occasionally
  221. fresh × old/stale
  222. friend × enemy
  223. front × rear
  224. in front of × back
  225. full × empty
  226. funny × serious
  227. future × past
  228. general × particular
  229. generous × mean
  230. gentle × violent
  231. gentleman × lady
  232. giant × tiny
  233. girl × boy
  234. give × take
  235. go × come
  236. good × bad
  237. grown-up × child
  238. guest × host
  239. guilty × innocent
  240. happiness × sadness
  241. happy × sad
  242. handsome × ugly
  243. hard × easy
  244. harvest × plant
  245. hate × enjoy
  246. health × disease
  247. healthy × ill
  248. heat × cold
  249. heaven × hell
  250. heavy × light
  251. hell × heaven
  252. here × there
  253. high × deep
  254. high × low
  255. hilly × flat
  256. hit × miss
  257. hopeful × desperate
  258. hopeless × hopeful
  259. horizontal × vertical
  260. host – guest
  261. hot – cold
  262. huge – tiny
  263. human – animal
  264. humane – cruel
  265. humid – dry
  266. hungry – thirsty
  267. husband – wife
  268. in front of – back
  269. ignore – notice
  270. ill – healty
  271. immigrate – emigrate
  272. immigration – emigration
  273. import – export
  274. in – out
  275. include – exclude
  276. increase – reduce
  277. innocent – guilty
  278. inside – outside
  279. insult – compliment
  280. intelligent – silly
  281. intentional – accidental
  282. be interested in – bore
  283. interesting – boring
  284. interrupt – continue
  285. junior – senior
  286. kind – cruel
  287. lack – abundance
  288. lady – gentleman
  289. land – take off
  290. land – water
  291. large – small
  292. last – first
  293. late – early
  294. laugh – cry
  295. lazy – active
  296. lead – follow
  297. learn – teach
  298. leave – arrive
  299. left – right
  300. lend – borrow
  301. less – more
  302. let – forbid
  303. lie – stand
  304. life – death
  305. light – dark
  306. light – heavy
  307. like – hate
  308. liquid – solid
  309. little – big
  310. little – much
  311. live – die
  312. long – short
  313. lose – win
  314. loser – winner
  315. loud – quiet
  316. love – hate
  317. lovely – terrible
  318. low – high
  319. lower – raise
  320. bad luck – good luck
  321. good luck – bad luck
  322. major – minor
  323. male – female
  324. man – woman
  325. many – few
  326. marriage – divorce
  327. married – divorced
  328. marry – divorce
  329. master – servant
  330. maximum – minimum
  331. mean – generous
  332. melt – freeze
  333. men – women
  334. mend – break
  335. mess – order
  336. midnight – noon
  337. minimum – maximum
  338. minor – major
  339. miss – hit
  340. miss – catch
  341. moderate – extreme
  342. modern – ancient
  343. monarchy – republic
  344. moon – sun
  345. more – less
  346. morning – evening
  347. mountain – valley
  348. much – little
  349. narrow – broad
  350. nasty – nice
  351. native – foreigner
  352. natural – artificial
  353. near – distant
  354. negative – affirmative
  355. nephew – niece
  356. never – always
  357. new – ancient
  358. nice – awful
  359. niece – nephew
  360. night – day
  361. no – yes
  362. nobody – everybody
  363. noisy – quiet
  364. noon – midnight
  365. none of – al lof
  366. normal – strange
  367. north – south
  368. not yet – already
  369. nothing – everything
  370. notice – ignore
  371. now – then
  372. occasionally – frequently
  373. occupied – vacant
  374. odd – even
  375. off – on
  376. often – seldom
  377. old – modern
  378. on – off
  379. open – closed
  380. open – closed
  381. opponent – supporter
  382. order – mess
  383. ordinary – special
  384. other – same
  385. out – in
  386. outside – inside
  387. outskirts – centre
  388. over – under
  389. parents – children
  390. part – whole
  391. partial – total
  392. particular – general
  393. pass – fail
  394. past – future
  395. peace – war
  396. permit – forbid
  397. plant – harvest
  398. plenty – lack
  399. pleasant – awful
  400. polite – rude
  401. poor – rich
  402. poverty – wealth
  403. powerful – weak
  404. presence – absence
  405. present – past
  406. pretty – ugly
  407. private – public
  408. probably – certainly
  409. professional – amateur
  410. protect – attack
  411. protection – attack
  412. public – private
  413. pull – push
  414. pupil – teacher
  415. push – pull
  416. question – answer
  417. quick – slow
  418. quiet – loud
  419. raise – lower
  420. rainy – sunny
  421. rear – front
  422. receive – send
  423. reduce – increase
  424. refuse – agree
  425. regret – satisfaction
  426. remember – forget
  427. repair – damage
  428. reply – ask
  429. reply – question
  430. republic – dictatorship
  431. rest – work
  432. rich – poor
  433. right – left
  434. right – wrong
  435. rise – sink
  436. rough – gentle
  437. rough – smooth
  438. rude – polite
  439. rural – urban
  440. sad – happy
  441. sadness – happiness
  442. safe – dangerous
  443. safety – danger
  444. salt – sugar
  445. same – different
  446. satisfaction – regret
  447. satisfy – annoy
  448. save – spend
  449. scream – whisper
  450. security – danger
  451. seldom – often
  452. sell – buy
  453. send – receive
  454. senior – junior
  455. separate – connect
  456. serious – funny
  457. servant – master
  458. set free – arrest
  459. shallow – deep
  460. sharp – blunt
  461. shelter – exposure
  462. short – long
  463. shout – whisper
  464. shut – open
  465. sick – healthy
  466. silent – noisy
  467. silly – intelligent
  468. simple – complicated
  469. sink – rise
  470. single – married
  471. sister – brother
  472. sit – stand
  473. slim – fat
  474. slow – fast
  475. small – big
  476. smooth – rough
  477. soft – hard
  478. solid – liquid
  479. some – many
  480. sometimes – often
  481. son – daughter
  482. soul – body
  483. sour – sweet
  484. south – north
  485. special – general
  486. spring – autumn
  487. stand – sit
  488. start – stop
  489. start – finish
  490. stop – start
  491. stand – lie
  492. strange – normal
  493. stranger – native
  494. strict – gentle
  495. strong – weak
  496. student – teacher
  497. stupid – clever
  498. suburb – centre
  499. succeed – fail
  500. success – failure
  501. subtract – add
  502. sugar – salt
  503. summer – winter
  504. sun – moon
  505. sunny – cloudy
  506. supporter – opponent
  507. suspect – trust
  508. sweet – bitter
  509. synonym – antonym
  510. take – give
  511. take off – land
  512. tall – small
  513. teach – learn
  514. teacher – pupil
  515. then – now
  516. terrible – lovely
  517. there – here
  518. thick – thin
  519. thin – thick
  520. thirsty – hungry
  521. throw – catch
  522. tight – loose
  523. tiny – giant
  524. together – apart
  525. tomorrow – yesterday
  526. top – bottom
  527. total – partial
  528. town – village
  529. tragedy – comedy
  530. true – false
  531. trust – suspect
  532. ugliness – beauty
  533. ugly – beautiful
  534. under – over
  535. unite – divide
  536. unity – division
  537. up – down
  538. upstairs – downstairs
  539. urban – rural
  540. useful – useless
  541. useless – useful
  542. vacant – occupied
  543. valley – mountain
  544. vertical – horizontal
  545. victory – defeat
  546. village – town
  547. violent – gentle
  548. visitor – host
  549. voluntary – compulsory
  550. vowel – consonant
  551. war – peace
  552. warm – cool
  553. waste – save
  554. water – land
  555. weak – powerful
  556. wealth – poverty
  557. wealthy – poor
  558. wedding – divorce
  559. well- ill
  560. west – east
  561. wet – dry
  562. whisper – scream
  563. white – black
  564. whole – part
  565. wide – narrow
  566. wife – husband
  567. win – lose
  568. winner – loser
  569. winter – summer
  570. work – rest
  571. woman – man
  572. women – men
  573. worse – better
  574. worst – best
  575. wrong – correct
  576. yes – – no
  577. yesterday – tomorrow
  578. young  old

करून पहा साधे सोपे प्रयोग.

करून पहा साधे सोपे प्रयोग.पाहण्यासाठी येथे click करा.

Saturday, March 23, 2019


विज्ञान सोपे प्रयोग (संग्रहित)

क्र. प्रयोगाचे नाव
1 Observe burnning candle
2 What makes paper fly off?
3 Dip bottle balloon inflates.
4 Wax rises up the wick
5 Jumping flame
6 Paper stays dry in water.
7 Does cap go down?
8 Look into the candle flame.
9 Pour air of one glass to the other.
10 Relight the unburned wax.
11 Air holds on paper.
12 Floating candle.
13 Air resists at surface.
14 Bottle blows out candle.
15 Egg gets shell-less.
16 Not so easy to break an egg.
17 Lift water with straw.
18 Bottle shower.
19 Egg - row or boiled.
20 Float an egg.
21 Water does't fall.
22 Can you drink?
23 Dancing naptha balls.
24 Can you drink? - 2
25 Liquid rainbow.
26 Drinking bowl for birds.
27 Oil sinks and rises.
28 Puff collapses tunnel.
29 Stone droped off a boat.
30 Where will brinjals go?
31 Doll drinks water.
32 Make a barometer.
33 Bulging water.
34 Does water push up?
35 Knot the water streams.
36 Make a hydrometer.
37 Blooming flower.
38 Float a potato.
39 Blow balloon inside a bottle.
40 Balloons move up-down.
41 Make your submarine.
42 Suck and inflate balloon.
43 Hold bowls by a balloon.
44 One sinks other floats!
45 Floating log problem.
46 Will cards fall together?
47 Automatic siphon.
48 Water clings to finger.
49 Water drop train.
50 Bernoulli's bag.
51 Catch if you can..
52 How many drops...
53 Hovering ball.
54 How much salt dissolve?
55 Separate salt from water.
56 Which empties first?
57 Burning needs oxygen.
58 Hole in palm!
59 Burning needs oxygen - 2 .
60 Cinematographic effect.
61 Collect breath of yest.
62 One eye is master eye!
63 Pupil reflex.
64

65

66

67

68

69

70

71

Friday, March 22, 2019

सद्विचाराची साधना


देवाचं स्मरण होण्यासाठी *ज्ञान* पाहिजे.
ज्ञानी होण्यासाठी *सदगुरु* पाहिजे.
सदगुरु मिळण्यासाठी *भाग्य* पाहिजे.
भाग्य मिळण्यासाठी *पुण्य* पाहिजे.
पुण्य मिळण्यासाठी
*सत्कर्म* ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे.
आणि सत्कर्म करण्यासाठी *सद्विचाराची साधना* आवश्यक आहे. सतत चांगला विचार करण्यानेच हातून सदाचार म्हणजे सत्कर्म घडते.

           

Thursday, March 21, 2019

(येथे टाकलेल्या गोष्टी इतर तंत्रस्नेही शिक्षकांच्या ब्लॉगवरून संग्रहित केल्या आहेत. )
       परिपाठात या गोष्टी मुलांना ऐकवता येतील.

क्र. गोष्टीचे नाव ----
1 चिमणी आणि वानर

2 चोराच्या हातात जमादारखाना
3 कुंभार सेनापती
4 मूर्खाला उपदेश
5 धर्मबुद्धी आणि पापबुद्धी
6 नाच रे मोरा
7 जादूचे झाड
8 राजकन्येची भलती चूक
9 सोन्याचा हंस
10 भटके गवई
11 कपटी जबडा हसून उघडा
12 कुत्रा आणि चिमणी
13 लाकडी हत्ती
14 शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ
15 तीन भाग्यवान मुले
16 आभाळ तुटलं धावा पळा
17 कोल्हयाची युक्ती
18 बेडकाची उंच उडी
19 संगतीचा परिणाम
20 भीम आणि बकासूर
21 मायावी जंगल
22 दोन मांजरे आणि एक वानर
23 हत्ती आणि मुंगी
24 कडबोळं गेलं गडगडत
25 मुंगी आणि कबूतर
26 नवलनगरीत बाळू
27 पाच फुलांची राणी
28 कुंभाराचे ढोंग
29 प्रामाणिक लाकूडतोड्या
30 सवय सुटली
31 रडका मोर
32 ब्राह्मण आणि मुंगसाचे पिल्लू
33 सिंह उंदीर आणि मांजर
34 पंचतंत्राची कथा
35 टोपीवाला आणि माकडे
36 मूर्ख मित्र
37 वाघ आणि शेतकरी
38 सज्जन चोर
39 वाघाचा वाढदिवस
40 आंब्याचं झाड आणि माती
41 उंदराने खाल्ला तराजू
42 बंधुप्रेम
43 हावरटपणाचे फळ
44 भला बिचारा ठण ठण पाळ
45 चतुर कोल्हा
46

47

48

49

50

Sunday, March 17, 2019

भारतीय फुले

त्रिमित प्रतिकृती pdf.

मराठी- या काळाच्या भाळावरती...

100 Opposite words.


To see 100 Opposite words please click here.

शिवघनुष्य कोणी मोडलं......😀


शाळेत इन्स्पेक्टर साहेब आले. त्यांनी एका मुलाला प्रश्न विचारला,

शिवधनुष्य कुणी मोडलं..?
मुलगा घाबरून म्हणाला, "मी नाही मोडलं.."
👶👶👦👦
साहेब चकित झाले..

त्यांनी गुरुजींना विचारले,
"असं काय म्हणतो हा मुलगा..?"

गुरुजी म्हणाले,
"परिस्थितीने गरीब आहे बिचारा, तो अशी काही तोडफोड करेल असं वाटत नाही."

साहेब तरातरा हेड मास्तरांकडे गेले आणि त्यांना म्हणाले,
"मी 'शिवधनुष्य कुणी मोडलं..?' असं विचारलं, तर तुमच्या शाळेतला मुलगा म्हणतो की 'मी नाही मोडलं' गुरुजी म्हणतात की 'मुलगा तसं काही करण्यातला वाटत नाही.' हा काय प्रकार आहे..?"

हेडमास्तरांना प्रचंड राग आला..

ते म्हणाले,
"कोण नाही म्हणतो..? छडी घेऊन गेलो ना की सगळे कबूल करतील 'मीच मोडलं' म्हणून..!"

प्रकरण गेले शिक्षणमंत्र्यापर्यंत..

शिक्षणमंत्री म्हणाले,👴
"हे पहा, आता मोडलंच आहे ना धनुष्य..? मग गप्प बसा. आधीच खूप गोष्टी अंगाशी आल्या आहेत, त्यात ही एक नको. येत्या बजेटला पैसे सँक्शन करतो, नवीन घ्या दोनतीन, आत्ता चर्चा नको..!"

साहेब हताश होऊन घरी आले..👨👨

बायकोला म्हणाले,

"मी एक प्रश्न विचारला, 'शिवधनुष्य कुणी मोडलं..?' तर कुणालाही माहिती नाही. तुला तरी आहे का माहिती..?"

बायको म्हणाली,👩👩
"हे बघा, सकाळपासून काम करून करून मी दमले आहे. त्यात तुम्ही आता येऊन काहीतरी फालतू प्रश्न विचारत आहात. मला काय माहिती हे काय कुणी मोडलं ते..? तुमचं हे नेहमीचंच आहे, स्वत: मोडायचं आणि दुसऱ्यावर ढकलायचं...!"😱😱

Saturday, March 16, 2019

जरा हसू या!😃

एका रुग्णाच्या ऑपरेशनच्या वेळी
रुग्णाला उलटे टांगले जाते.

रुग्ण भीती आणि आश्चर्य व्यक्त करीत - “डॉक्टरसाहेब,काय हे ?असं का ?
ऑपरेशन टेबल वर झोपवणार नाही का ?”

डॉक्टर-“नाही.मला अशीच सवय आहे...
पूर्वी मी मटणाच्या दुकानात कामाला होतो.”

रहस्यकथा- भुकेली रात्र

लाईफ मॅनेजमेंट

              शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने(घासफूसने) भरून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाहीत तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. दुसरा नियम असा आहे की, ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटत राहतो. सुखी सुख, दुःखी दुःख, ज्ञानी ज्ञान, भ्रमित भ्रम आणि भयभीत भय वाटत राहतो.

गुणी माणसं वेचा...

   यश मिळवायचं असेल तर  गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. जुन्या सौहार्दाचा शोध घ्या ! नव्याने मैत्री करा. साऱ्यांच्या संपर्कात राहा. मिळूनमिसळून वागा. तुमच्यासाठी जे जे उत्तम ते ते शोषून घेण्यासाठी तत्पर असलेले टिपकागद व्हा !

Sunday, March 10, 2019

ओळखा भाजी किंवा फळ

ओळखा  भाजी किंवा  फळ 
1 : वाकड्या  छत्रीला काळा फुगा जोडला,
     दो गुणांचा दिसे हा जांभळा  वा काळा ..
2 : आई बाप म्हणजेच हे..
3 : म्हातारीला आवडला लेकीने दिला..
4 : घामोळ्यांनी  भरले  अंगाशी , रूप  मकर परि         चव  नकोशी..
5 : नाजूक  सुंदर  सुबक ठेंगणी , लुसलुशीत ती 
     बाळाची  काकी..
6 : लाल खाता चंद्र अर्धा  राहिला, रूप मोठे     
     अवजड ओझे परि उन्हाळी घरी आला ..
7 : वर रुपासी मी बोचरा व्हिलन प्राण,
     परि अंतर्यामी ही सोनचाफ्यांची खाण!
8 : सुरस मुके हो प्रेमे चोखीत,
     चोखिता रस, मुख हो रसभरीत ..
9 : उखाण्याची भाजी आवडीची,
     परि पित्त कारक व कडवी ही...
10: सुंदर शेलाटी मुलगी म्हणजेच...
11 : काट्याविना ना गुलाब मिळावा ,
        फळावरी मग झाड उगवता हवा हवा       
        रसभरीत स्वादिष्ट ठेवा!
12 :रंग, गंध ना , नाजूक नसता तरीही म्हणते फूल,
       चविष्टतेने नटता सुंदर  पाडी सर्वांना भूल..
13 : नेसली पितांबर तरी अंतरी आहे गोरी..
14 : छोटे पणाला उपमा याची ,
       खेळातला कच्चा गडी हाची..
15 : कंजूषीचा अर्क मी, उन्हाळी प्रदेशात गर्क   
        मी...
16 : पानापानांनी देह हा नटला,
        गोल मटोल देह की हो झाला...

सहकार्यभावनेचे महत्व

     उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमताअसते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे!

यशाचा राजमार्ग

   यश मिळवायचं असेल तर  गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. जुन्या सौहार्दाचा शोध घ्या ! नव्याने मैत्री करा. साऱ्यांच्या संपर्कात राहा. मिळूनमिसळून वागा. तुमच्यासाठी जे जे उत्तम ते ते शोषून घेण्यासाठी तत्पर असलेले टिपकागद व्हा !

यशस्वी क्रियाशीलता

  एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता !

यशाचे गमक

    प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काही ना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं.

कविता - ध्यास

सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करून एका सावित्रीच्या लेकीने त्यांना वाहिलेली ही शब्दसुमने!! 
                          
                                    *ध्यास*                                 10.3.2019

कठीण भासे मार्ग जरी हा,
मी न मागे सरणार.
घेऊनी उराशी ध्यास माझ्या,
मार्ग हा मी आक्रमिणार!
               कष्ट मजला पडो कितीही,
               येऊ दे संकटे हजार,
               नकोच पर्वा अपयशाची,
               विजयपताका झळकविणार!
लेक अशी मी सावित्रीची,
ज्योत इवली जणू पणतीची,
परि ठाम हा माझा निर्धार!
ध्येय शिखरे उंच यशाची,
नवनवीन मी सर करणार!
                घेऊनी उराशी ध्यास माझ्या,
                मार्ग हा मी आक्रमिणार!
          🌟🎯🏅🏆🌍🔝💯♕♾🌟

                            सौ. वर्षा शिंदे
                            उपशिक्षिका
                    शिक्षणविभाग पुणे म.न.पा.

कविता - 'ती'

                     'ती'
जन्म देण्या बाळाला ती सोसतसे कळ
झेप घेण्या पंखांमधे, देते त्याच्या बळ
कष्टतसे दिनरात,तरी उरी नाही खंत
स्वतःसाठी परि नाही क्षणाची उसंत
संसाराच्या अंगणी ती होतसे मानिनी
लढताना संकटांशी भासे रणरागिणी
झाली आता सजग ती जाणतसे हक्क
कर्तृत्वाने तिच्या झाली दुनिया ही थक्क
जपताना नातीगोती स्थिर ठेवी मती
समाजाच्या विकासाची सूत्रे तिच्या हाती
राखू जरा भान, ठेवू स्त्री शक्तीची जाण
देऊ सदा तिला मान,आज घेऊ मनी आण
स्त्री शक्तीला करूनीया सदैव वंदन
वर्षभरी करू साजरा रोजच महिलादिन !

                       सौ.वर्षा शिंदे
                       उपशिक्षिका



Sunday, March 3, 2019

माझी कविता (श्री.राऊत सर)


👩‍🏫 *'माँ'- स्तर !* 👨‍🏫

देशभक्ती ही काय असे
गुरुजनां कुणी ना शिकवावे !
👩‍🏫👨‍🏫👩‍🏫👨‍🏫👩‍🏫👨‍🏫👩‍🏫
गुरुच तारक अन संहारक
राष्ट्रउद्धारा मास्तर प्रेरक
संस्कारांचा रस्ता कणखर
नवपिढीचा उमदा चालक
विश्वासाने राष्ट्रसुकाणू
गुरुजनां हाती  धरवावे
देशभक्ती ही काय असे
गुरुजनां कुणी ना शिकवावे !
👩‍🏫👨‍🏫👩‍🏫👨‍🏫👩‍🏫👨‍🏫👩‍🏫
नितीन -संजय शहीद वंदावा
शिवबा अन संभाजी छावा
नामा-तुका अन ज्ञानदेवा
शाहू फुले आंबेडकर जेव्हा
एक मुखे गुणगान करुनी
गुरूंचरणी म्हणे शीर झुकवावे
देशभक्ती ही काय असे
गुरुजनां कुणी ना शिकवावे !
👩‍🏫👨‍🏫👩‍🏫👨‍🏫👩‍🏫👨‍🏫👩‍🏫
गोरगरीब घरचा विद्यार्थी
चार घास सुखे खात असे
ज्ञान घेऊनि समस्त जगाचे
भारत गुण-गाण गात असे
पाहुनी त्या डोळ्यांतील स्वप्ने
तिरंग्याने अभिमाने डोलावे
देशभक्ती ही काय असे
गुरुजनां कुणी ना शिकवावे !
👩‍🏫👨‍🏫👩‍🏫👨‍🏫👩‍🏫👨‍🏫👩‍🏫
                -श्रीमंत राऊत सर-
            म.न.पा.शाळा क्र.47 मुलींची

Saturday, March 2, 2019

सम्मान

*श्रद्धा* ज्ञान देती है,*नम्रता* मान देती है,*योग्यता* स्थान देती है और तीनों मिल जाए तो व्यक्ति को हर जगह *सम्मान* देती है!
****